Hockey : ऑलिम्पिक यशानंतर भारताचा पहिला पराभव

Share

मुंबई: जर्मनीने हॉकीच्या सामन्यात भारताचा २-० असा पराभव झाला आहे. जर्मनीचा संघ सध्या २ सामन्यांच्या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर आहे आणि मालिकेतील पहिला सामना नवी दिल्लीत खेळवण्यात आला. सामन्याचा पहिला गोल चौथ्या मिनिटात हेनरिक मर्टजेन्सने केला .तर ३०व्या मिनिटाला कर्णधार लूकस विंडफेडरने पेनल्टी कॉर्नरला गोलमध्ये रूपांतरित केला आणि जर्मनीला आघाडी मिळवून दिली.

जर्मनीने शेवटपर्यंत ही आघाडी कायम राखत विजय मिळवला. २०१४ नंतर दिल्लीच्या मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेला पहिला आंतरराष्ट्रीय हॉकी सामना होता. त्यामुळे या सामन्याला प्रेक्षकांची मोठी गर्दी होती. जर्मनीचा संघ सध्या हॉकीमध्ये वर्ल्ड चॅम्पियन आहे.

तुटला हा रेकॉर्ड

भारतीय हॉकी संघाच्या अनोखी स्ट्रीकचा अंत झाला. गेल्या ६४७ दिवसांतील हा पहिला सामना आहे जेव्हा भारतीय संघाने एकही गोल स्कोर केला नाही. तर ऑगस्ट २०२२नंतर हा पहिला सामना आहे जिथे टीम इंडियाला कोणताही गोल न करता पराभव सहन करावा लागला. या सामन्यात कर्णधार हरमनप्रीत सिंहचे यशही दिसले कारण टीम इंडियाला यात ७ पेनल्टी कॉर्नर मिळाले मात्र सरपंच साहेब नावाने प्रसिद्ध असणाऱ्या हरमनप्रीतला पेनल्टी कॉर्नरचे रूपांतर गोलमध्ये करता आले नाही.

कर्णधार हरमनप्रीतचा दिवस इतका खराब होता की जेव्हा २६व्या मिनिटाला टीम इंडियाला पेनल्टी स्ट्रोक मिळाला तेव्हा हरमनप्रीत एक वर्ल्ड क्लस ड्रॅगफ्लिकर असताना जर्मनीविरुद्ध सामन्यात पेनल्टी स्ट्रोकवर गोल करू शकला नाही. जर्मनी सध्या वर्ल्ड चॅम्पियन आहे आणि पॅरिस ऑलिम्पिक २०२४मध्ये त्यांनी रौप्य पदक जिंकले होते.

Recent Posts

KKR vs GT, IPL 2025: गुजरातविरुद्ध घरच्या मैदानावर कोलकत्त्याचा लाजिरवाणा पराभव

कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…

7 hours ago

उबाठाला राणेंचा दणका! सिंधुदुर्गात होणार १५०० कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश!

२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…

7 hours ago

ही कणकवली नव्हे, कुडाळ आहे! निलेश राणे यांच्याशी पंगा नको!

माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…

8 hours ago

नाल्यातून गाळ काढताना ३० सेकंदाचा व्हिडीओ कंत्राट कंपनीला बंधनकारक

लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…

8 hours ago

PM Modi : आजची धोरणं, उद्याचं भारत! – पंतप्रधान मोदींचा नागरी सेवकांना मंत्र

PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…

9 hours ago