Tuesday, December 10, 2024
Homeताज्या घडामोडीReliance Industries : मुकेश अंबानींचा डिज्नी हॉटस्टारवर मालकी हक्क! जिओ सिनेमा करणार...

Reliance Industries : मुकेश अंबानींचा डिज्नी हॉटस्टारवर मालकी हक्क! जिओ सिनेमा करणार बंद?

रिलायन्स इंडस्ट्रीज मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

मुंबई : जिओ सिनेमा (JioCinema) आणि डिज्नी हॉटस्टारवर (Disney plus Hotstar) हे भारतातील दोन लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म्स (OTT Platforms) आहेत. मात्र स्ध्या उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी डिज्नी हॉटस्टार या स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मवर मालकी हक्क बजावला आहे. त्यामुळे दोन्ही प्लॅटफॉर्मवरील युजर्सची संख्या पाहता मुकेश अंबानी जिओ सिनेमाबाबत मोठा निर्णय घेणार आहेत. लवकरच रिलायन्स इंडस्ट्रिजकडून (Reliance Industries) डिज्नी हॉटस्टार आणि जिओ सिनेमा यांचे विलीनकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे जिओ सिनेमा प्लॅटफॉर्म कायमचा बंद होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जिओ सिनेमाच्या मासिक वापरकर्त्यांची संख्या २२.५ आहे आणि डिज्नी हॉटस्टारचे ३३.३ कोटी मासिक वापरकर्ते आहेत. डिज्नी हॉटस्टारचा साधारण ३.५ कोटी लोक फिस देऊन वापर करतात. तर इंडियन प्रिमियर लीगच्या दरम्यान हा आकडा ६.१ कोटी सबस्क्रायबर्सपर्यंत वाढला होता.

त्याचबरोबर डिज्नी हॉटस्टारकडे प्रगत तंत्रज्ञान आहे. त्यामुळे दोन विविध स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म न चालवता त्यांना एकत्र करण्याचा निर्णय रिलायन्स इंडस्ट्रिजने घेतला आहे. तसेच जिओ सिनेमाचे विलीनकरण होऊन डिज्नी हॉटस्टार हे ओटीटी प्लॅटफॉर्म कायम ठेवले जाईल, असे देखील रिलायन्स इंडस्ट्रिजने म्हटले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -