बंगळुरू: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना बंगळुरूच्या के.एम.चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळवला जात आहे. सामन्यात भारताचा दुसरा डाव ४६२ धावांवर आटोपला. म्हणजेच न्यूझीलंडला विजयासाठी १०७ धावांचे आव्हान मिळाले आहे.
धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचे खातेही उघडलेले नाही. म्हणजेच न्यूझीलंडला विजयासाठी १०७ धावा हव्या असून त्यांचे १० विकेट बाकी आहेत. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा कर्णधार टॉम लॅथम आणि डेवॉन कॉन्वे नाबाद होते.
भारताची सामन्यावरील पकड ढिली, आता चाहत्यांना पावसाची प्रतीक्षा
आज या सामन्याचा पाचवा दिवस असेल. सध्या भारतीय संघ ज्या स्थितीत आहे अशातच त्यांची सामन्यावरील पकड ढिली झाली आहे. जर भारतीय संघाने २००च्या जवळपास आव्हान दिले असते तर न्यूझीलंडच्या संघावर दबाव असता. मात्र आता न्यूझीलंडला केवळ लहान लक्ष्य पार करायचे आहे. एकूण मिळून भारतीय संघासाठी हा सामना जिंकणे कठीण दिसत आहे.
अशातच भारतीय चाहते आता प्रतीक्षा करत आहेत की पावसाने तरी कृपा करावी. ज्यामुळे सामना अनिर्णीत राहील. खेळाचा पहिला दिवस पावसाने वाया गेला होता. आता बंगळुरू कसोटीच्या पाचव्या दिवशीही पावसाची शक्यता आहे. या दिवशी ८० टक्के पावसाची शक्यता आहे. सकाळी ९ आणि १० वाजता पावसाची शक्यता ५१ टक्के आहे. तर पुढील दोन तासांत ४७ आणि ४५ टक्के पावसाची शक्यता आहे