Israel-Hezbollah War : हिजबुल्लाहचा थेट घरात घुसून नेतन्याहू यांच्यावर ड्रोन हल्ला

इस्रायल : इस्रायलच्या कैसरिया भागात हिजबुल्लाहने तीन ड्रोन्सच्या माध्यमातून नेतन्याहू यांच्या घरावर हल्ला केल्याचा दावा केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यामागे हिजबुल्लाहच खरं टार्गेट या भागातील इस्रायली पंतप्रधानांच निवासस्थान होतं. हिजबुल्लाहचे इस्रायलने दोन ड्रोन्स पाडले. पण एक ड्रोन कैसरियामधील एका इमारतीवर जाऊन आदळलं. आयडीएफनुसार, या हल्ल्यामध्ये कोणीही जखमी झालेलं नाहीय. इस्रायली सैन्यांनी दोन ड्रोन्स पाडले असून चौकशी सुरु आहे.


इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाकडून कैसरिया ड्रोन हल्ल्याबद्दल स्टेटमेंट जारी करण्यात आलं आहे. बेंजामिन नेतन्याहू आणि त्यांची पत्नी कैसरिया हल्ल्याच्यावेळी येथील निवासस्थानी नव्हते. इस्रायली पंतप्रधानांच्या निवासस्थानाला हिजबुल्लाहने ड्रोन हल्ल्याद्वारे चांगलंच लक्ष्य करण्याच प्रयत्न केला आहे. हिजबुल्लाहच ड्रोन परिसरात घुसताच सायरन वाजू लागलं. यानंतर इस्रायली सैन्याने हेलीकॉप्टरद्वारे ड्रोनला टार्गेट केलं.



इस्रायलचे सर्व भाग टार्गेटमध्ये : नईम कासिम


इस्रायलने २३ सप्टेंबरला लेबनानमध्ये हिजबुल्लाह विरुद्ध सैन्य अभियान सुरु केलं होतं. या दरम्यान २७ सप्टेंबरला हिजबुल्लाह चीफ हसन नसरल्लाहचा बेरुत येथे झालेल्या हवाई हल्ल्यात मृत्यू झाला. इस्रायलने ऑक्टोंबरच्या सुरुवातीला नसरल्लाहचा उत्तराधिकारी सफीद्दीनला मारल्याचा दावा केला होता. हिजबुल्लाहने त्यानंतर इस्रायलवरील हल्ले वाढवले आहेत. हिजबुल्लाहचा डेप्युटी चीफ नईम कासिमने काही दिवसांआधी इस्रायलचे सर्व भाग त्याच्या टार्गेटमध्ये आहेत, असं म्हटलं होतं.



इतक्या हजार लोकांना जुनं घर सोडावं लागलं


लेबनानमध्ये हिजबुल्लाह विरुद्ध इस्रायली हल्ले सुरु आहेत. या हल्ल्यात २३ सप्टेंबरपासून सुरु असलेल्या आतापर्यंत जवळपास २००० लोकांचा मृत्यू झाला आहे. १२ लाखापेक्षा जास्त लोक विस्थापित झाले आहेत. उत्तर इस्रायलवर हिजबुल्लाहकडून हल्ले सुरु होते, त्यामुळे ६० हजार ज्यूंना लोकांना आपल घर सोडावं लागलं आहे.



हिजबुल्लाहची सर्व टॉप लीडरशिप संपवली


या सर्व ज्यूंना लोकांना इस्रायलने पुन्हा आपल्या घरी उत्तर इस्रायलमध्ये आणण्याचा संकल्प करुन हिजबुल्लाह विरोधात मोठी सैन्य करावाई सुरु केली. हिजबुल्लाहची इस्रायलने जवळपास सर्व टॉप लीडरशिप संपवली आहे. आता हिज्बुल्लाह इस्रायलच्या हल्ल्यांमुळे अजून आक्रमक झाला आहे. आता नेतन्याहू यांच्या घराला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे.













Comments
Add Comment

Donald Trump : युद्धविराम संपुष्टात, इराणवर पुन्हा जोरदार हल्ला करू - ट्रम्प

अंकारा : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प(Donald Trump) यांनी बुधवारी सांगितले की, अमेरिका इराणवर आणखी एका

Pakistan : पाकिस्तानमधील बलुचिस्तानमध्ये पोलिसांवर हल्ला, ९ पोलीस ठार

झियारत : पाकिस्तानच्या (Pakistan) नैऋत्येकडील भागात बलुचिस्तान (Balochistan) प्रांताच्या झियारत जिल्ह्यात (Ziarat district) पोलिसांवर

France Bomb Blast : फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या सीरिया दौऱ्यादरम्यान दमास्कसमध्ये स्फोट; सुरक्षेची चिंता वाढली

दमास्कस : फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन सध्या सीरियाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या

2,000-Year-Old Indian Gold Rings : थायलंडमध्ये २००० वर्षे जुन्या भारतीय सोन्याच्या अंगठ्या सापडल्या; प्राचीन व्यापारी संबंधांचे पुरावे

बँकॉक: पश्चिम थायलंडमधील पेचबुरी प्रांतातील 'डॉन याई थोंग' (Don Yai Thong) या पुरातत्व स्थळावर सुरू असलेल्या उत्खननात

अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात भारतीय नौदलाची दमदार उपस्थिती; आयएनएस सुदर्शिनी ठरले आकर्षण

वॉशिंग्टन डीसी : भारतीय नौदलाच्या आयएनएस सुदर्शिनी या जहाजाने अमेरिकेत भारताची शान उंचावली आहे. अमेरिका आपल्या

Venezuela Earthquake : ८ दिवस ढिगाऱ्याखाली अडकूनही मृत्यूवर मात; जिवंत बाहेर आला सुरक्षा रक्षक

व्हेनेझुएला : भूकंपामुळे (Earthquake) कोसळलेल्या नऊ मजली इमारतीच्या (Nine-storey Building) ढिगाऱ्याखाली तब्बल आठ दिवस अडकूनही एका