Thursday, January 22, 2026

PM Narendra Modi : पंतप्रधान पुन्हा जाणार रशियाच्या दौऱ्यावर!

PM Narendra Modi : पंतप्रधान पुन्हा जाणार रशियाच्या दौऱ्यावर!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पुन्हा एकदा रशियाच्या दौऱ्यावर (Russia Daura) जाणार आहेत. रशियाच्या अध्यक्षतेत कझान येथे आयोजित सोळाव्या ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी २२ व २३ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाला भेट देणार आहेत, अशी माहिती भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दिली.

रशियामध्ये होणाऱ्या ब्रिक्स परिषदेत ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका यासह सौदी अरेबिया, इराण, इथियोपिया, इजिप्त, अर्जेंटिना आणि संयुक्त अरब अमिराती या सर्व देशांमधील नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व देशांच्या नेत्यांची भेट घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दुसरा रशिया दौरा २ दिवसांचा  ठरू शकतो.

दरम्यान, यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी ८ जुलै रोजी २ दिवसांसाठी रशियाला गेले होते. त्यादरम्यान पंतप्रधान मोदी यांना रशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपॉस्टलने सन्मानित करण्यात आले होते.

Comments
Add Comment