Monday, May 19, 2025

देशताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

ED Action : मुडाप्रकरणी कर्नाटकात ईडीची छापेमारी!

ED Action : मुडाप्रकरणी कर्नाटकात ईडीची छापेमारी!

नवी दिल्ली : ईडी अधिकाऱ्यांच्या एका पथकाने आज म्हैसूर येथील मुडा कार्यालयावर छापे (ED Action) टाकले आहेत. ईडीच्या या पथकामध्ये १२ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. ईडीच्या १२ अधिकाऱ्यांच्या पथकाने मुडाच्या कार्यालयावर जमीन वाटप प्रकरणाच्या संदर्भात छापा टाकला. या प्रकरणामध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांचेही नाव आहे.


दरम्यान ईडी अधिकाऱ्यांनी पथकाने म्हैसूरचे आयुक्त एएन रघुनंदन यांच्यासह एमयूडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर अधिकारी या घोटाळा प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे ताब्यात घेण्याची शक्यता आहे. तसेच जमीन वाटप घोटाळा प्रकरणात तपास यंत्रणा सर्व मुडा अधिकाऱ्यांची चौकशी देखील करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सिद्धरामय्या यांचे निकटवर्तीय मानले जाणारे के मरीगौडा यांनी प्रकृतीच्या कारणास्तव एमयूडीएच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर काही दिवसांनी अंमलबजावणी संचालनालयाने ही कारवाई केली आहे.

Comments
Add Comment