मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर होताच आता अनेक नेते एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करताना दिसत आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या मुद्द्यावरुन सध्या शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackerey) आणि भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) हे दोघे आमनेसामने आले आहेत. धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या मुद्द्यावरुन आदित्य ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली होती. आता या टीकेला आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिल आहे. “आम्ही खुल्या चर्चेला तयार आहोत. तुम्ही या”, असे आवाहन आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंना दिलं आहे.
धारावी पुनर्विकास योजनेवरुन आदित्य ठाकरेंनी भाजपवर जोरदार आरोप केले आहे. धारावीत ३०० एकर पुनर्विकासाच टेंडर अदानीला दिलंय. मुंबईमधील तुमची आमची जमीन अदानीला फुकटात दिलीय. मढ, कुर्ला, देवनार येथील जमिन अदानींना दिली आहे. मुंबईमधली एकूण १०८० एकर जमीन फुकटात अदानींच्या घशात घातलीय, असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे. आता आशिष शेलार यांनी या आरोपावर चांगलच प्रत्युत्तर दिले आहे.
आशिष शेलार यांनी नुकतंच त्यांच्या अधिकृत ट्विटरवरुन एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी १०८० एकर आकडा आला कुठून? असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यासोबतच आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंना आम्ही खुल्या चर्चेला तयार आहोत.. तुम्ही या, असे मोठं आवाहनसुद्धा दिलं आहे.
बुद्धिमान खोटारडे आदित्य ठाकरे आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्या.. खोटं बोलून पळ काढू नका !
◆1080 एकर आकडा आला कुठून ?
◆अदानीच्या नावावर 1080 एकर जागा चढली, सरकारने दिली याबाबत शासकीय कागद, कॅबिनेट निर्णय दाखवा…
◆उलट धारावीतील नेचर पार्क 37 एकरचा भूखंड हडप करण्याचा डाव आहे की नाही ?
◆उत्तर द्या ! आम्ही खुल्या चर्चेला तयार आहोत.. तुम्ही या !!
◆नाहीतर पेग्विनची काळजी करीत राणीच्या बागेत बसा !
दरम्यान, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे काऊंटडाऊन सुरु झालंय. केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी पत्रकार परिषद घेत राज्यातील निवडणुकांची घोषणा केली आहे. महाराष्ट्रात येत्या २० नोव्हेंबर २०२४ ला विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. तर त्यानंतर लगेचच तीन दिवसांनी २३ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजताच राज्यातील सर्वच पक्ष जोरदार कामाला लागले आहेत.
नवी दिल्ली : भारताच्या पुरुष क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक (हेड कोच) गौतम गंभीर याला आयसिस…
मुंबई: उन्हाळा आला की तो आपल्यासोबत अनेक आव्हाने घेऊन येतो. घामामुळे आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचेला…
दिवसभर तुमची त्वचा ताजी राहील मुंबई: उन्हाळ्यात आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. कारण आता…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सागरी तसेच भू सीमा मोठी आहे. भू…
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या आणि जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या…
मुंबई(ज्ञानेश सावंत): राजस्थानने सलग चार सामने गमावले आहेत त्यापैकी तीन सामने अगदी थोड्या अंतराने गमावले…