Rohit Sharma : रोहित शर्मा बनणार भारताचा 'सिक्सर किंग'!

नवी दिल्ली : टीम इंडियाने (Team India) बांगलादेश विरुद्ध कसोटी मालिकेत निर्भेळ यश मिळवले. तर दुसरीकडे न्यूझीलंडला मात्र श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेत पराभव स्वीकारावा लागला. आता उद्यापासून भारत-न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. मालिकेतील पहिला सामना १६ ते २० ऑक्टोबर दरम्यान बंगळूरूच्या चिन्नस्वामी स्टेडियमवर होणार आहे.


मालिकेतील दुसरा सामना २४ ते २८ ऑक्टोबर दरम्यान पुण्याला तर तिसरा सामना १ नोव्हेंबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याला भारताचा सिक्सर किंग बनण्याची मोठी संधी आहे. बांगलादेश विरूद्ध भारतीय कर्णधार रोहित शर्माने अप्रतिम नेतृत्वकौशल्य दाखवले. पण त्याला फलंदाजीत फारशी चमक दाखवता आली नाही. पहिल्या कसोटीमध्ये रोहितने ६ आणि ५ धावा केल्या. तर दुसऱ्या सामन्यात २३ आणि ८ धावा केल्या. रोहित चारही डावांमध्ये अपयशी ठरला. पण या मालिकेत त्याला धावा करणे आवश्यक आहे.


त्यासोबतच रोहितकडे भारताचा कसोटी सिक्सर किंग बनण्याचीही चांगली संधी आहे. रोहित शर्माने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये एकूण ८७ षटकार लगावले आहेत. भारताकडून कसोटीमध्ये सर्वाधिक षटकार लगावणाऱ्या वीरेंदर सेहवागच्या नावे ९१ षटकार आहेत. त्यामुळे रोहित या सामन्यात किंवा मालिकेत ५ षटकार मारुन सिक्सर किंग बनू शकतो.

Comments
Add Comment

Narendra Modi : पंतप्रधान 26 जुलैला विकसित व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम मधील सहभागींशी साधणार संवाद

पंतप्रधान 26 जुलैला विकसित व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम मधील सहभागींशी साधणार संवाद नवी दिल्ली : पंतप्रधान

Prataprao Jadhav : श्री संत गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त ₹150 चे स्मृती नाणे व टपाल तिकीट जारी करण्याची केंद्राकडे मागणी

नवी दिल्ली : केंद्रीय आयुष मंत्रालय (स्वतंत्र प्रभार) आणि आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव

Weather Warning : पुढील १२ तासांत देशातील १८ राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळाचा तडाखा; वाऱ्याचा वेग ताशी ८० किमीपर्यंत पोहोचण्याची शक्यता

नवी दिल्ली: देशभरात मान्सूनचा जोर दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालला असून, भारतीय हवामान विभागाने (IMD) देशातील

Train Accident : उत्तर प्रदेशमध्ये मोठा रेल्वे अपघात टळला, मालगाडीचे सात डबे रुळावरून घसरले

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशमधील अमेठी परिसरात एक मोठा रेल्वे अपघात टळला. पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास सिंदुरवा

ChatGPT Down : चॅटजीपीटीची सेवा अचानक ठप्प; भारतासह जगभरातील कोट्यवधी युजर्स त्रस्त, कंपनीचे स्पष्टीकरण...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) विश्वात जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या 'ChatGPT' या लोकप्रिय AI चॅटबॉटची सेवा शनिवारी

Uttar Pradesh Crime : चित्रकूटमध्ये धक्कादायक घटना : NEET च्या विद्यार्थिनीवर ३ नराधमांचा सामूहिक अत्याचार; मित्राचे हात-पाय बांधले आणि...

चित्रकूट : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) चित्रकूट (chitrakut) येथून अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर