Sanjay Narvekar : हातात कोयता अन् चेहऱ्यावर राग; नार्वेकर आता दिसणार 'इन अ‍ॅक्शन मोड'!

'रानटी' चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला


मुंबई : मराठी सिनेसृष्टीसह बॉलीवूडमध्ये (Bollywood) ‘देढ फुट्या’ या भूमिकेने लोकप्रिय असणारे अभिनेते संजय नार्वेकर (Sanjay Narvekar) चाहत्यांना लवकरच अॅक्शन मोडमध्ये दिसून येणार आहेत. पुनीत बालन स्टुडिओ निर्मित आणि समित कक्कड दिग्दर्शित ‘रानटी’ (Raanti) हा मराठीतला सगळ्यात मोठा अ‍ॅक्शनपट सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून यामध्ये संजय नार्वेकर अॅक्शन मोडमध्ये दिसणार आहेत.


आपल्या भूमिकेबद्दल बोलताना संजय नार्वेकर सांगतात, ‘सदा राणे’ हा वरकरणी अतिशय शांत पण आतून कपटी असा खलनायक साकारणे माझ्यासाठी चॅलेंजिंग होते. चित्रपटाच्या कथानकाला वळण देणारी ही भूमिका प्रेक्षकांनाही धडकी भरवणारी आहे. ‘कथेच्या गरजेनुसार भूमिकेत शिरणे माझ्यासाठी नेहमीच आव्हानात्मक असते. अशा भूमिका फार कमी लिहिल्या जातात, दिग्दर्शक समित कक्कड यांच्या ‘रानटी’ चित्रपटामुळे मला ‘सदा राणे’ या खलनायकाच्या व्यक्तिरेखेत प्रवेश करण्याची जबरदस्त संधी मिळाली आणि मी माझ्या पद्धतीने ती पडद्यावर साकारली आहे. समितच्या चित्रपटात काम करणे हा नेहमीच एक भन्नाट अनुभव असतो. त्याच्या प्रत्येक चित्रपटाची कथा जबरदस्त असल्याने त्यात भूमिका करणे हे प्रत्येकासाठी चॅलेंजिंग असतं. प्रेक्षकांनाही हा 'सदा राणे' दीर्घकाळ लक्षात राहील याची मला खात्री वाटते.



कधी होणार प्रदर्शित?


दरम्यान, ‘रानटी’ चित्रपटासाठी हृषिकेश कोळी यांचं लिखाण, अजित परब यांचं संगीत, अमर मोहिले यांचं पार्श्वसंगीत, एझाज गुलाब यांची साहसदृष्ये, सेतु श्रीराम यांचं छायाचित्रण, आशिष म्हात्रे यांचं संकलन अशी भक्कम तांत्रिक बाजू असलेली टीम लाभलेली आहे. येत्या २२ नोव्हेंबर रोजी रानटी चित्रपट सर्व चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे.

Comments
Add Comment

Madhuri Dixit : लवकरच...! सोनी मराठी वाहिनीवरील 'कोण होणार करोडपती' चे सूत्रसंचालन करणार अभिनेत्री माधुरी दीक्षित

मुंबई : मराठी मनोरंजनविश्वात एका नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. सोनी मराठी वाहिनी आणि Sony LIV प्रेक्षकांचा ज्ञानावर

Sara Tendulkar : मला माझ्या होणाऱ्या नवऱ्यामध्ये हवाय असा गुण... सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकरचा मोठा खुलासा!

भारतीय क्रिकेटचा देव मानले जाणारे सचिन तेंडुलकर यांची लाडकी लेक सारा तेंडुलकर ही नेहमीच चाहत्यांच्या आणि सोशल

Govinda On Salman Khan: 'पाटर्नर, तू हिरोसारखा दिसत नाहीस...' गोविंदाचं 'ते' वक्तव्य अन् सलमान खानचं नशीब बदललं

बॉलिवूड अभिनेता गोविंदा आपल्या खासगी आयुष्याबद्दल नेहमीच चर्चेत असतो. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने

Dil Chahta Hai completes 25 years : तरुणाईला वेड लावणारा तो एव्हरग्रीन सिनेमा आणि आजही कायम असलेली 'त्या' गाण्याची क्रेझ!

बॉलीवूडमध्ये काही चित्रपट असे असतात, जे केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न राहता प्रेक्षकांच्या आयुष्याचा आणि

AR Rahman Son Accident : प्रसिध्द संगीतकार ए.आर. रहमान यांच्या मुलाचा कार अपघात; थोडक्यात बचावला आमीन

चेन्नई : प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमान (A R Rahman) यांचा मुलगा आणि गायक ए.आर. आमीन (A R Ameen) याचा कार अपघात झाल्याची धक्कादायक

Dashmi Movie Poster Launch : अन्यायाविरुद्ध उठणार ‘दशमी’ची गर्जना! रहस्य, संघर्ष आणि स्त्रीशक्तीची कहाणी घेऊन मराठी चित्रपटाची दमदार एंट्री

मुंबई : भारतीय संस्कृतीत विजयादशमी म्हणजे केवळ सण नाही, तर अन्यायावर न्यायाचा, अधर्मावर धर्माचा आणि दुष्ट