बाजारात जाण्यावरून झालेल्या वादातून मुलाने केला आईचा खून

कुडाळ : बाजारात जाण्यावरून आई आणि मुलामध्ये झालेल्या वादात संतापाच्या भरात नराधन मुलाने आईचा गळा आवळून खून केला. ही दुर्दैवी घटना कुडाळ तालुक्यातील कसाल बौद्धवाडी येथे सोमवारी रात्री घडली.


याप्रकरणी सुरेंद्र मोहन कदम (वय ४०) याच्यावर स्वतःची आई मनोरमा मोहन कदम (वय ५८) हिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले असल्याचे सिंधुदुर्ग नगरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे यांनी सांगितले.


आईचा खून केल्यानंतर बॅग भरून पळून जाण्याचा प्रयत्न करत असतानाच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.


बाजारात जाण्यावरून झालेल्या वादातून त्याने आईला सुरुवातीला हाताने मारहाण केली. मात्र घरातून पळून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असलेल्या आईला घराबाहेर पकडून दोरीच्या सहाय्याने गळा दाबून खून केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. याबाबत सिंधुदुर्ग नगरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.


याबाबतची फिर्याद सिंधुदुर्ग नगरी पोलीस ठाण्याचे पोलीस शैलेश सोनसुरकर यांनी दिली. त्यानुसार संशयीत सुरेंद्र मोहन कदम याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यात वापरलेली विहिरीचे पाणी काढण्यासाठी असलेली दोरी जप्त करण्यात आली आहे. १४ ऑक्टोबर रोजी रात्री साडेसात ते आठच्या सुमारास ही घटना कसाल बौद्धवाडी येथील आंब्याचे झाडाखाली घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Comments
Add Comment

रुचिरा जाधव नंतर रोहित आर्याने "या" अभिनेत्याला केला संपर्क ; चित्रपटातील भूमिका ही केली ऑफर

मुंबई : मुंबईतील पवईमध्ये घडलेल्या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. रोहित आर्या या व्यक्तीने १७ लहान मुलांना

कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरला आलेल्या प्रसिद्ध कीर्तनकाराचं निधन

पंढरपूर: कीर्तन परंपरेत संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे कोकणातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. दत्ताराम सीताराम नागप

दिल्ली नाही इंद्रप्रस्थ म्हणा, भाजप खासदाराची मागणी, अमित शाहंना पाठवलं पत्र

नवी दिल्ली : देशातील अनेक शहरांची आणि जिल्ह्यांची नावे बदलल्यानंतर 'आता थेट राजधानी दिल्लीचं नाव बदलण्याची

डी२सी ब्रँड्स आणि क्विस-सर्विस प्‍लॅटफॉर्म्‍स मुंबईतील ग्राहक अर्थव्‍यवस्‍थेला चालना देतात- लिंक्‍डइन

लिंक्‍डइनच्‍या २०२५ टॉप स्‍टार्टअप्‍स लिस्‍टमधून निदर्शनास मुंबई:लिंक्‍डइन (Linkedin) या वैश्विक पातळीवरील मोठ्या

डीपी वर्ल्ड पायाभूत सुविधा परिसंस्थेसाठी भारतात ५ अब्ज डॉलर्स गुंतवणार !

गेल्या तीन दशकांमध्ये केलेल्या ३ अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीला चालना मुंबई: डीपी वर्ल्डने भारतात ५ अब्ज डॉलर्सची

क्रिकेटमध्ये पुरुष आणि महिलांसाठी सात वेगवेगळे नियम

मुंबई : भारतीय पुरुष क्रिकेट संघ (Indian cricket team) सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत व्यस्त आहे. तर