संदीप घरत यांनी दिले पाचफुटी नागाला जीवदान!

मुरुड : मुरुड तालुक्यातील खारआंबोली येथील रहिवासी संदीप ठाकूर यांच्या घरी आढळून आलेा. त्या पाचफुटी नागाला सर्पमित्र संदीप यांनी वनविभागाचे अधिकारी मनोज वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वनरक्षक किरण गायकर यांच्या सहकार्याने जीवदान दिले आहे. त्यामुळे सर्पमित्र संदीप घरत यांची सर्वत्र गोड कौतुक होत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, खारआंबोली येथील रहिवासी संदीप ठाकूर यांच्या घरामध्ये साप आढळून येताच घबराट पसरली होती. त्यांनी तातडीने वनविभागाचे वनपाल किरण गायकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तातडीने सर्पमित्र संदीप यांना भ्रमणध्वनीद्वारे खबर दिली. माहिती मिळताच संदीप घरत यांनी खारआंबोली येथील संदीप ठाकूर यांच्या घरी येऊन पाच फुटी नागाला आपल्या कौशल्याने पकडून वनअधिकारी मनोज वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक किरण गायकर यांच्या सहकार्याने जवळील जंगलात सुरक्षितपणे सोडून जीवदान दिल्याबद्दल सर्वत्र कौतुक व्यक्त केले जात आहे.

Comments
Add Comment

ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन मेहेंदळे यांचे निधन

मुंबई: ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांचे बुधवारी सायंकाळी हृदयविकाराच्या

मोठा प्रश्न? कावळेच नाहीत! पितृपक्षात वाडीला शिवणार कोण?

मुंबई : हिंदू धर्मातील पितृपक्ष काळात पूर्वजांना श्राद्ध आणि तर्पण करणे हा पवित्र संस्कार आहे. या काळात घराघरांत

१ कोटी लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवणार - मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर :  प्रत्येक गावात जिल्हा बॅंकेमार्फत लाडक्या बहिणींना बिनव्याजी एक लाख रुपयांचे कर्ज देऊन

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन घ्यायला जात असाल तर आधी हे वाचा

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन आज दिवसभर राहणार बंद मुंबई: कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर हे प्रसिद्ध

देशभरात उद्यापासून “स्वस्थ नारी, सशक्त परिवार" अभियानाला सुरूवात

पालघर : केंद्र सरकारतर्फे महिलांच्या आरोग्याची तपासणी, जनजागृती आणि पोषण सेवांचा प्रसार करण्यासाठी “स्वस्थ

नागपुर पोलिसांची ‘ऑपरेशन शक्ती' अंतर्गत मोठी कारवाई, OYO मध्ये चालला होता भलताच प्रकार

ओयो हॉटेलमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, तिघांना अटक, एक फरार नागपूर: नागपूर शहर पोलिसांच्या ‘ऑपरेशन शक्ती’