IPL 2025 : आयपीएल २०२५ आधीच मुंबई इंडियन्सला मिळणार नवे प्रशिक्षक!

Share

एमआयने घेतला मोठा निर्णय ‘यांस’ मिळाली संधी

नवी दिल्ली : आयपीएल २०२५ (IPL 2025) पूर्वी अनेक संघांमध्ये मोठे बदल घडताना पाहायला मिळू शकते. यंदाच्या आयपीएलपूर्वी काही संघांनी आपल्या संघाचा प्रशिक्षक वर्ग बदलला आहे, तर होणाऱ्या लिलावापूर्वी संघ चांगलीच तयारी करत आहे. आता चॅम्पियन संघ म्हणून ओळख असलेल्या मुंबई इंडियन्सनेही (Mumbai Indians) नव्या प्रशिक्षकाची घोषणा केली आहे. आयपीएल २०२५ पूर्वी आयपीएलचा चॅम्पियन संघ मुंबई इंडियन्सने मोठी घोषणा केली आहे. मुंबई इंडियन्सने नव्या खेळाडूचा संघाचा प्रशिक्षक म्हणून घोषणा केली आहे. मुंबई इंडियन्सने मार्क बाऊचरच्या जागी व्हीडिओ शेअर करत नव्या प्रशिक्षकाची घोषणा केली आहे. मुंबई इंडियन्सने श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू महेला जयवर्धने याची संघाच्या प्रशिक्षकपदी नेमणूक केली आहे. महेला जयवर्धने यापूर्वीही गेली अनेक वर्षे मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता. आता पुन्हा एकदा त्याला आयपीएल २०२५ साठी संघात सामील केले आहे. याची घोषणा मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर पोस्ट करत केली आहे.

मार्क बाउचर २०२३ आणि २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक होते. मात्र आता त्याची जागा जयवर्धने घेणार आहे. जयवर्धनेचा प्रशिक्षक म्हणून चांगला रेकॉर्ड आहे. जयवर्धनेच्या उपस्थितीत मुंबईने तीन विजेतेपद पटकावले. या संघाने २०१७, २०१९ आणि २०२० मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावले. मुंबईने आतापर्यंत पाच वेळा विजेतेपद पटकावले आहे. २०२२ मध्ये मुंबईने जयवर्धनेकडे महत्त्वाची जबाबदारी सोपवली होती. त्याला क्रिकेटचे ग्लोबल हेड बनवण्यात आले. या काळात त्याने महिला प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सलाही मदत केली. तो MLC आणि MIE साठी देखील महत्त्वपूर्ण कामगिरी करताना दिसला.

मुंबई इंडियन्ससाठी २०२४ चा सीझन खूपच खराब

आयपीएल २०२४ मुंबईसाठी खूप वाईट होते. मुंबई इंडियन्स संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी हार्दिक पंड्याच्या खांद्यावर दिली गेली. गुणतालिकेत संघ तळाच्या स्थानावर होता. मुंबईने या मोसमात एकूण १४ सामने खेळले आणि केवळ ४ सामने जिंकले. एमआयला १० सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले. मुंबईच्या संघात अनेक मोठे खेळाडू होते. पण तरीही संघाला पराभवाचा सामना करावा लागला.

Recent Posts

अनधिकृत इमारतींची संख्या ही ११० ने वाढली

पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…

13 minutes ago

जलवाहिनी फुटल्याने २४ तास ‘पाणीबाणीचे’ मुंबईकरांसमोर संकट

काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…

51 minutes ago

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५

साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…

2 hours ago

World Book Day : भूतकाळासह भविष्यकाळातील दुवा म्हणजेच ‘पुस्तकं’

मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…

4 hours ago

‘टीनएजर्सच्या पालकांकडून अपेक्षा’

डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…

4 hours ago

समाजवादी विचारवंत ना. ग. गोरे

सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…

4 hours ago