Baba Siddiqui Murder : लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली बाबा सिद्दिकींच्या हत्येची जबाबदारी!

मुंबई : अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddiqui) यांची गोळ्या घालून हत्या (Murder) करण्यात आली. या घटनेमुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या घटनेबाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर नेमकी हत्या कोणी व का केली असे याबाबतची चर्चा सुरु होती. परंतु आता या चर्चांना पुर्णविराम मिळालं आहे.


बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी लॉरेन्स बिश्नोई गँगने (Lawrence Bishnoi Group) जबाबदारी स्वीकारली असून पोलिसांनी दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. तर याप्रकरणातील तिसऱ्या आरोपीची ओळख देखील पटल्याची माहिती मिळत आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगने या हत्येची जबाबदारी स्वीकारत सोशल मीडियावर 'बाबा सिद्दिकी यांची हत्या आम्ही केली' असा हिंदी भाषेत मजकूर पोस्ट शेअर केली आहे.



लॉरेन्स बिश्नोई गँगने पोस्टमध्ये काय म्हटले?


देह आणि संपत्ती हे माझ्यासाठी महत्त्वाचे नाही. आजपर्यंत मी फक्त सत्कर्म केले, कायम मैत्रीचे कर्तव्य मी पाळले. सलमान खान आम्हाला हे सगळे नको होते, पण तुम्ही आमच्या भावाला त्रास दिला. आज जो बाबा सिद्दिकी सभ्य, मनमिळवू आणि स्वच्छ प्रतिमा असल्याचे दाखवत आहे तो एकेकाळी त्याच्यावर मोक्का लागला होता. बाबा सिद्दिकीच्या हत्येचे कारण अनुज थापन आणि दाऊदचे बॉलीवूड, राजकारणी लोकांशी करत असलेले डिलींग हेच आहे. आमची कोणाशीच वैयक्तिक वैर नाही पण जो कोणी सलमान खान आणि दाऊदची मदर करेल त्याला हिशोब आम्हाला ठेवावा लागेल. आमच्या कोणत्याही भावाला जर तुम्ही मारले तर आम्ही उत्तर देणारच, आम्ही कधीच पहिला वार केला नाही, जय श्री राम.


Comments
Add Comment

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.

नारळासाठी ४५ रुपयांची फोडणी; आवक घटल्याने मुंबईकरांना भुर्दंड

मुंबई : सण, उत्सव कालावधीत नारळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुंबईकरांना सध्या या नारळासाठी ४५ ते ५० रुपये मोजावे

नरिमन पॉइंट ते वसईपर्यंत १० मार्गांवर होणार जलवाहतूक

मुंबई : महामुंबईत १० मार्गांवर जलवाहतूक सुरू होणार आहे. याद्वारे नव्या विमानतळाला चार मार्ग जोडले जाणार आहेत.

काय चाललंय काय ? एका महिन्यात तीन वेळा बंद पडली मोनोरेल

मुंबई : मध्य मुंबई आणि पूर्वेकडील उपनगरे यांना जोडणारी मोनोरेल ही वेगाने आरामदायी प्रवास करण्यासाठी सुरू

महाराष्ट्राच्या नव्या राज्यपालांनी 'या' भाषेत घेतली शपथ

मुंबई : आचार्य देवव्रत यांनी सोमवारी १५ सप्टेंबर रोजी सकाळी राजभवनात झालेल्या सोहळ्यात राज्यपालपदाची शपथ

Rain Update: पावसामुळे मोनो रेल बंद पडली, मुंबईकरांनो घराबाहेर पडण्याआधी हे वाचून घ्या

मुंबई: मुंबई तसेच उपनगरांमध्ये मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस बरसत आहे. रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे मुंबई