बीड : आज भाजप विधान परिषदेच्या आमदार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा भगवानगडावरील दसरा मेळावा पार पडला आहे. (Dasara Melava 2024) या मेळाव्यासाठी १२ वर्षांनी राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) उपस्थित आहेत. भगवानगडावरील ते या दसरा मेळाव्यातील चर्चेचा विषय ठरले होते, मात्र, आमदार पंकजा मुंडे यांनी जमलेल्यांना संबोधित करताना त्यांच्या मुलाला व्यासपीठावर बोलावून आणि त्याची ओळख करून दिली आहे. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, माझ्यापेक्षा हा फार उंच आणि फार गोड आहे. हा माझा मुलगा आर्यमन. हा भगवान बाबाच्या दर्शनाला आलाय. यावेळी आपल्या मुलाला पुढे बोलावून आर्यमन याची ओळख पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी करून दिली. उपस्थितांनी यावेळी एकच जल्लोष केला. आर्यमनचं लाँचिंगच्या चर्चा दसरा मेळाव्यातून सध्या सुरू आहेत.
हा माझ्यापेक्षा फार उंच पण छोटासा आहे, आज भगवान बाबाच्या दर्शनाला आला आहे, तो मला फार प्रिय आहे, असं वाटतं असेल ना तुम्हाला, हे माझं लेकरू आहे म्हणून ते प्रिय आहे, असं वाटतं असेल ना पण, मी त्याला सांगितलं आहे, तुझ्यापेक्षा जास्त मला हे लोक प्रिय आहेत. कारण माझ्यावर जीएसटीचा छापा पडला तर, या बह्हादरांनी माझ्यासाठी बारा कोटी जमा केले. लोकसभा निवडणुकीचा जेव्हा निकाल लागला तेव्हा माझ्या लेकरांनी जीव दिला. मी माझ्या लेकरांपेक्षा जास्त तुमच्यावर जीव लावते, आणि तुम्ही माझ्यावर, मला बास इतकंच पाहिजे, बाकी काही नको.
पुढे पंकजा मुंडे व्यासपिठावरील मान्यवरांची ओळख करून देताना म्हणाल्या, माझे बंधू महादेव जानकर. पिवळे शर्टवाले. किती पिवळे शर्ट आहे तुमच्याकडे? असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी त्यांना विचारला, त्यावर एकच हस्यकल्लोळ उठला. गोंडस लेकरू लक्ष्मण हाके. गोंडस आहे की नाही. काल त्यांनी व्हिडिओ पाठवला. दसरा मेळाव्याला येतो म्हणाला. माझ्या दसऱ्याला मी कुणालाही निमंत्रण देत नाही. पण माझा सन्मान ठेवून हाके इथे आले.