महादेव बेटिंग ऍप : सौरभ चंद्रकारला दुबईहून अटक

Share

नवी दिल्ली : महादेव बेटिंग ऍपचा (Mahadev Betting App) प्रमोटर सौरभ चंद्रकार (Saurabh Chandrakar) याला दुबईहून अटक करण्यात आली आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) इंटरपोलला केलेल्या विनंतीनुसार सौरभच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. त्यानुसार ईडी, परराष्ट्रीय मंत्रालय आणि गृहमंत्रालयाच्या समन्वयातून सौरभला अटक केली आहे.

याबाबत अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यूएई अधिकाऱ्यांनी काल परराष्ट्र मंत्रालयाशी अधिकृतपणे संवाद साधून सौरभ चंद्राकर याला दुबईत अटक केल्याची माहिती दिली. सौरभची प्रत्यार्पण प्रक्रिया पुढील काही दिवसांत पूर्ण होईल आणि त्याला भारतात प्रत्यार्पण करण्यासाठी यूएई प्राधिकरणाकडे विनंती केल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

महादेव बेटिंग ॲपच्या मुख्य प्रमोटरपैकी एक असलेल्या सौरभ चंद्राकरला मनी लाँड्रिंग आणि फसवणूक प्रकरणात इंटरपोलने जारी केलेल्या अटक वॉरंटच्या आधारे दुबईत करण्यात आली आहे. आता लवकरच त्याला भारतात आणले जाण्याची शक्यता आहे. या ॲपचा आणखी एक प्रमोटर रवी उप्पल याला गेल्या वर्षीच्या अखेरीस दुबईत अटक करण्यात आली होती. त्यांच्याविरुद्ध रेड नोटीस जारी करण्याची विनंती ईडीने केली होती. त्यानंतर त्याच्या मुसक्या आवळल्या होत्या.

सौरभचे यूएईतील रास अल खैमाह येथे फेब्रुवारी २०२३ मध्ये लग्न झाले होते. त्याने त्याच्या लग्नात सुमारे २०० कोटी रुपये खर्च केला होता. त्याने भारतातून नातेवाईकांना लग्न सोहळ्याला आणण्यासाठी खासगी जेट भाड्याने घेतले होते. तसेच लग्नात परफॉर्म करण्यासाठी त्याने सेलिब्रिटींसाठी मोठी रक्कम मोजली दिली होती, असा ईडीचा आरोप आहे. महादेव बेटिंग ॲप घोटाळा हा सुमारे ६ हजार कोटींचा आहे.

महादेव ऑनलाइन बेटिंग घोटाळा हा छत्तीसगडमधील भिलाई येथील व्यक्तींचा समावेश असलेल्या आणि यूएई तसेच भारतातील विविध राज्यांमधून चालवल्या जाणाऱ्या बेकायदेशीर कारवायांचे एक जाळे आहे. छत्तीसगडमध्ये २०२३ साली विविध ठिकाणी केलेल्या छामेमारीच्या कारवाईदरम्यान ईडीने या घोटाळ्याचा पर्दाफाश केला होता. ईडीच्या माहितीनुसार, महादेव ऑनलाइन बेटिंग ऍप हा एक अनधिकृत प्लॅटफॉर्म होता. ज्या माध्यमातून क्रिकेट आणि फुटबॉलसह विविध खेळांवर तसेच जुगाराच्या इतर प्रकारांवर बेकायदेशीर बेटिंगचा व्यवहार चालत होता. संपूर्ण भारतामध्ये आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या या ऍपने झटपट पैसे कमविण्याचे आमिष दाखवून अनेकांना आकर्षिक केले होते.

Recent Posts

साहित्यभूषण पुरस्कारासाठी आता दहा लाख रुपये देणार : उदय सामंत

रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…

18 minutes ago

मुख्यमंत्री सचिवालयात लवकरच पीजीआरएस प्रणाली

नागपूर:  विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…

57 minutes ago

नॅशनल पार्कमधील मिनी ट्रेन सुरू होणार

बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…

1 hour ago

मुख्यमंत्र्यांच्या जनता दरबारात ६२६ अर्ज

नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…

2 hours ago

‘प्रधानमंत्री जनधन योजना’चे अभूतपूर्व जागतिक यश!

प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…

8 hours ago

ट्रम्प टॅरिफ अनर्थ…

उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…

8 hours ago