सुनील धाऊ झळके, भिवंडी
महाराष्ट्र सरकारने नुकतेच रतनजी टाटा यांना उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित केल्याचे वाचून आमच्यासारख्या भारतीयांना आनंद झाला. रतन टाटा हे भारतातील एक उद्योग क्षेत्रातील यशस्वी आणि नामवंत प्रसिद्ध असे व्यक्तिमत्त्व. त्यांनी अनेक कंपन्या विकत घेऊन त्यांना उच्च शिखरावर पोहोचवल्या आहेत. भारतातील सर्वात मोठे बिझनेसमन म्हणून त्यांची संपूर्ण देशातच नव्हे तर परदेशातही ख्याती आहे. त्यांची संपूर्ण देशावर २००४ मध्ये हिंद महासागरांत आलेली सुनामी, २००८ मध्ये मुंबईत झालेला दहशतवादी हल्ला आणि नैसर्गिक आपत्कालीन परिस्थिती उद्भवली किंवा कोविड-१९ सारखे मोठे सर्वप्रथम टाटा हे सर्वात पुढे मदतीला धावत असतात. अगदी देशासाठी नेहमीच आपली संपत्ती मुक्तपणे उधळायची तयारी अद्यापही ठेवतात, अशा आपत्तीमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीचे निवारणकार्यात ते अत्यंत अग्रेसर असलेल्या रतन टाटा यांचा हा सहभाग सामाजिक कल्याण्यासाठी अत्यंत सहानुभूती व वचनबद्धता दर्शवणारा असाच आहे. त्यामुळे असा आभाळासारख्या मोठ्या मनाचा, हिमालयाच्या उंचीचा हा माणूस आम्हा भारतीयांसाठी एक आदर्श आणि दीपस्तंभसारखे असल्याने प्रत्येक भारतीयांना अशा हिमालयाची उंची असलेल्या कर्मयोगी माणसाचा अभिमान वाटतो.
आपल्याच तन-मन-धनाने मोठी असलेली बनाव करणारी माणसं आपण नेहमीच पाहतो; परंतु ही मंडळी फक्त मोठेपणाचे आव आणणारी, दिखावा करणारी असतात, याबाबत आपल्या पूर्वजांनी केलेल्या अनेक वर्षांच्या म्हणी, वाक्प्रचार पितळ उघडे पडणे याचा प्रत्यय आल्यापासून राहात नाही; परंतु रतनजी टाटा हे आजोबा जमशेदजी टाटा यांचे वडील नवल टाटा यांच्या संस्कारामुळे रसायन बनल्याने भारताच्या विकासाच्या दृष्टीने हे रसायन कामी आले. भारतामध्येच नव्हे तर त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाने आणि उत्तम नियोजनामुळे इतर शंभर देशांमध्येही आपला बिजनेस वाढवून भारताचे नांव संपूर्ण जगामध्ये नावारूपाला आणण्याचे असामान्य योगदान त्यांनी दिलेले आहे, असा भारतीय उद्योजक या भारतामध्ये जन्माला आला आणि आज टाटा कंपनी ही एकाच बिझनेसमध्ये न राहता त्यांनी ॲटोमोटीव्ह, रिटेल, रियल इस्टेट, हॉटेल्स लाईफ इन्सुर, ई-कॉमर्स होम अप्लायन्सेस इ. क्षेत्रांत भरीव कामगिरी केलेली असल्यानेच त्यांच्या कंपन्यांची नावेही टाटा पॉवर, टाटा मोटर्स, टाटा स्टील, टाटा केमिकल्स, टाटा कन्सल्टन्सी, टाटा कस्टमर सर्व्हिसेस, टाटा कन्झुमर, टाटा अॅडव्हान्स सिस्टम, टाटा कम्युनिकेशन इ. कंपन्यांनाही आपल्या कार्यकुशलतेने यशोशिखरावर पोहोचविले आहे. सर्वात महत्त्वाचे आणि देशासाठी अभिमानास्पद भावलेली त्यांची गोष्ट अशी आहे की, या सर्व कंपन्या म्हणजे टाटा सूपमधून प्राप्त झालेल्या आर्थिक उत्पन्नापैकी किया कमाल ६५ टक्के हिस्सा हा टाटा चॅरिटेबल ट्रस्टमध्ये दान केले जाते. त्यामुळे त्यांचा जगातल्या श्रीमंतांच्या यादीमध्ये समावेश झालेला नाही. देशातील नागरिकांप्रति त्यांची मनाची श्रीमंती किती मोठी आहे. म्हणजे कितीही माया असली तरी स्वार्थासाठी वापरली जाते, त्यातून त्याचा देखावा जास्त असतो ती कोणाच्याही कामी येत नाही; परंतु रतनजी टाटांच्या मनाच्या श्रीमतीचे उदाहरण प्रत्येक भारतीयांना दिलासा देणारा ठरणारा आहे, यातूनच त्यांच्या मनात भारतातील लोकांबद्दलचं प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा दिसतो. पण देश प्रेमाचे जाज्वल्य अभिमान व त्यांची परोपकारी वृत्तीही दिसून येते.
रतनजी टाटांसारखे उद्योग यशस्वी का आणि त्यांच्या यशाच्या मंत्राच्याबाबत त्याबद्दल त्यांचा एक किस्सा नमूद करावासा वाटतो की, सन-२००१ मध्ये टाटा मोटर्सने एक लाख टाटा इंडिका कारची निर्मिती केली. त्यावेळी कर्मचाऱ्यांना शाबासकी व कौतुकाची थाप देण्यासाठी येणार होते; परंतु ते येईपर्यंत कर्मचाऱ्यांना स्ट्रेस मॅनेजमेंटच्या कार्यक्रमाद्वारे प्रशिक्षण संपताना त्यांचे आगमन झाले, त्यावेळी कार्यक्रमासंदर्भात त्यांनी चौकशी केल्यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, मी आज अनेक कंपन्यांची जबाबदारी स्वीकारलेली असतानासुद्धा मला अजिबात स्ट्रेस नाही. त्याचे कारण असे आहे, मला माहीत आहे माझे कर्मचारी दिलेली जबाबदारी कामास प्राधान्य देऊन करीत आहेत; परंतु त्यांनाही माहिती आहे की जर कामाप्रती बेजबाबदारपणे वर्तन करणाऱ्यांना मी कामावर ठेवणार नाही. या शिस्तीचे प्रत्येकाने पालन करणे ही प्रत्येक काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीच आहे. अशा पद्धतीने त्यांनी दिलेली शाबासकीची थाप देऊन सर्वांचे कौतुक करून त्यांना शिस्तीची जाणीवही करून दिली.
आज त्यामुळे टाटा कंपनीची प्रगती आणि रतन टाटा यांचं व्यावसायिक यश आणि यशाचे रहस्यदिसतेय, असे खासगी क्षेत्रांतच शक्य होताना दिसतेय, इतर क्षेत्रांत याचा अभाव असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे रतन टाटा हे एक उत्तम ऊद्योगपती, परोपकारी व गुंतवणूकदार अशा पद्धतीने काम करीत त्यांनी विविध क्षेत्रांवर प्रभाव टाकला आहे. आरोग्यसेवा, शिक्षण, ग्रामीण विकास आणि कला, संस्कृतीवर लक्ष केंद्रित करणाऱ्या टाटा ट्रस्टची स्थापना करून देशातील नागरिकांसाठी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे, त्यामुळे भारतातील असंख्य व्यक्तीचे जीवन सुधारले आहे.
भारतातील असंख्य लोकांना रोजगार देताना त्यांची तितकीच सर्वार्थाने सुरक्षा त्यांनी पाहिलेली आहे, आपल्या कामगारांनाही त्यांनी वेळोवेळी सर्व मदत करून अनेकांचे जीवही वाचविलेले आहेत, अशा परोपकारी, ऊद्योगरत्न व मोठ्या मनाच्या माणसाला, देवासारखा मदतीला धावून येणाऱ्या अशा देवदूतांस ज्याने भारताचे नाव जगामध्ये उच्च शिखरावर नेले, भारताची कीर्ती जगभरात पसरविली, त्यामध्ये वृद्धीच केली आहे अशा रतनजी नवल टाटा यांचा हा थोडक्यातील मांडलेल्या जीवनचरित्राप्रमाणे, त्यांनी देशवासीयांसाठी, देशासाठी केलेल्या आणि बजावलेल्या अतुलनीय कामगिरीबाबत भारताच्या केंद्र सरकारने त्यांच्या या कार्याची योग्य ती दखल घेऊन रतनजी नवल टाटांना आता कोणताही किंतु परंतु न ठेवता भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान म्हणून भारतरत्न पुरस्कार बहाल करून त्यांचा यथोचित गौरव करावा यासाठीच समस्त भारतवासीयांच्या वतीने हा लेखप्रपंच.