Sunday, January 19, 2025
Homeताज्या घडामोडी'त्या' १०५८ उमेदवारांना एसटीच्या सेवेत सामावून घेणार!

‘त्या’ १०५८ उमेदवारांना एसटीच्या सेवेत सामावून घेणार!

मुंबई : सरळ सेवा भरती सन २०१९ अंतर्गत अतिरिक्त यादीवरील एकूण १०५८ उमेदवारांना एसटीच्या सेवेमध्ये चालक तथा वाहक या पदावर सामावून घेतले जाणार असल्याची माहिती एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी दिली.

सन २०१९च्या भरतीमध्ये निवड झाल्यापैकी गैरहजर अथवा अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या ऐवजी त्याच भरती मधील प्रतीक्षा यादीवरील सुमारे ३३७ उमेदवारांना नेमणूक देण्याची प्रक्रिया महामंडळात सुरू करण्यात येत आहे. तसेच, प्रतीक्षा यादीवरील उर्वरित सर्व ७२१ उमेदवारांना आवश्यकते प्रमाणे व रिक्त जागेनुसार रा. प. सेवेत सामावून घेण्याची कार्यवाही करणेबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

या संदर्भात संबंधित उमेदवार, लोकप्रतिनिधी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अध्यक्ष भरत गोगावले यांना भेटून निवेदन सादर केले होते. त्यांच्या निवेदनाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना तातडीने नेमणुका देण्याच्या सूचना अध्यक्ष भरत गोगावले यांनी दि. ०१.१०.२०२४ रोजीच्या रा. प. महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत दिल्या होत्या. त्यानुसार संबंधितांना नेमणुका देण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असून, या सर्व उमेदवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अध्यक्ष भरत गोगावले यांचे आभार मानले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -