राहुरी : श्रीरामपूरचे माजी आमदार व अशोक ऊद्योग समुहाचे अध्यक्ष भानुदास मुरकुटे यांच्यावर राहुरी पोलिस ठाण्यात भादवि ३७६ (बलात्कार) नुसार गुन्हा दाखल झाला असून पिडीता बँक कर्मचारी असल्याचे समजते.
राहुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्याशी भ्रमणध्वनी वरून संपर्क केला असता त्यांनी बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून रात्रीच श्री मुरकुटे यांना ताब्यात घेतले असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
यासंदर्भात अधिक तपास सुरू असून सायंकाळी ५ वाजता अधिकृत प्रेसनोट रिलीज केली जाणार असल्याचेही सांगितले आहे.
दरम्यान अशोक कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत श्री मुरकुटे यांनी पालकमंत्री ना. विखे पा. यांच्यावर गंभीर आरोप केले होते. सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहायला सुरूवात झाली आहे. त्यानुषंगाने या घटनेला राजकीय अंग असल्याची खमंग चर्चाही तालुक्यातून व्यक्त होत आहे.
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…