Friday, July 11, 2025

माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल!

माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल!

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय अंग असल्याची खमंग चर्चा


राहुरी : श्रीरामपूरचे माजी आमदार व अशोक ऊद्योग समुहाचे अध्यक्ष भानुदास मुरकुटे यांच्यावर राहुरी पोलिस ठाण्यात भादवि ३७६ (बलात्कार) नुसार गुन्हा दाखल झाला असून पिडीता बँक कर्मचारी असल्याचे समजते.


राहुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्याशी भ्रमणध्वनी वरून संपर्क केला असता त्यांनी  बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून रात्रीच श्री मुरकुटे यांना ताब्यात घेतले असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.


यासंदर्भात अधिक तपास सुरू असून सायंकाळी ५ वाजता अधिकृत प्रेसनोट रिलीज केली जाणार असल्याचेही सांगितले आहे.


दरम्यान अशोक कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत श्री मुरकुटे यांनी पालकमंत्री ना. विखे पा. यांच्यावर गंभीर आरोप केले होते. सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहायला सुरूवात झाली आहे.  त्यानुषंगाने या घटनेला राजकीय अंग असल्याची खमंग चर्चाही तालुक्यातून व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment