लासलगाव : अल्पावधीत पैसे दाम दुप्पट करण्याचे (Double price in 30 days) आमिष दाखवून सर्वसामान्य नागरिकांच्या स्वप्नांचा गैरफायदा घेणारे काही कमी नाही. असाच प्रकार लासलगाव येथे उघडकीस आला आहे. लासलगाव येथील स्टार इन्स्पायर ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने अल्पावधीत पैसे दाम दुप्पट करण्याचे आमिष दाखवून लासलगावकरांना २०० कोटींचा तर इतर चार राज्यातील गुंतवणूकदारांना हजारो कोटी रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात सोमनाथ मुरलीधर गांगुर्डे राहणार टाकळी विंचूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कंपनीचे सर्वेसर्वा सतीश पोपटराव काळे व संचालक योगेश परशराम काळे दोन्ही राहणार टाकळी (विं) व त्यांच्या साथीदारांविरुद्ध लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी सोमनाथ गांगुर्डे यांची याप्रकरणी ५० लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाली असून यापुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहे.
अल्पावधीत श्रीमंत होण्याच्या आमिषाने आणि सोन्याच्या लोभापायी लासलगाव सह इतर राज्यातील देखील मोठ्या प्रमाणात असलेल्या गुंतवणूकदारांचे पैसे बुडणार का? या समस्येने गुंतवणूकदार हैराण झाले आहेत.
लासलगाव व परिसरात गेल्या गेल्या चार पाच दिवसांपासून आर्थिक वातावरण ढवळून निघाले आहे. केवळ काही महिन्यातच गुंतवलेली रक्कम दाम दुप्पट होण्याच्या आणि कमी किमतीत सोन्याच्या दागिन्याची अभिलाषा नागरिकांना किती मूर्खात आणि वेड्यात काढणारी व नुकसानीस निमंत्रण देणारी ठरली आहे याचा जोरदार धसका लासलगाव व परिसरातील गुंतवणूकदार व नागरिकांनी घेतला आहे.
गेल्या आठ दिवसांपासून लासलगाव येथील स्टार इन्स्पायर ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे सर्वेसर्वा सतीश काळे व त्यांचे सहकारी संचालक योगेश काळे हे अचानक गायब झाले. अचानक समाज माध्यमांवर एक ऑडिओ क्लिप वायरल झाली आणि गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले आहेत. लासलगावमध्ये दामदुप्पट पैशाच्या अमीषाने, स्वस्तात प्लॉटच्या आमिषाने, हजारो मध्यमवर्गीय गरीब लोकांना करोडोंचा गंडा घालून त्यांना कंगाल केल्याची घटना सात वर्षांपूर्वी घडलेली असून त्याची पुनरावृत्ती आता पुन्हा एकदा झाली आहे. या वेळी मात्र फसवणूक करणाऱ्यानी आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेत लासलगाव सह महाराष्ट्रभर हजारो नागरिकांचे कोट्यवधी रुपये दामदुप्पट करण्याच्या हेतूने आमिष दाखवून गोळा करून आज मितीला कंपनीला कुलूप लावून कंपनीचे सर्वेसर्वा सतीश काळे व संचालक योगेश काळे पसार झाल्याची चर्चा लासलगाव परिसरात सुरू आहे.
लासलगाव येथे असलेली स्टार इन्स्पायर ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी सुरुवातीला ५००० रुपयांच्या बदल्यात एका महिन्यात १० हजार रुपये देत होती. लोकांची हाव वाढत गेली. चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं पाहुन कंपनीने ३० दिवसात १ लाखावर २ लाख परतीची योजना काढल्यावर अनेकजण तुटुन पडले. अनेकांनी दागिने गहाण ठेवून पैसे गुंतवले आणि मालदार झाले आहे. आपल्याला पैसे मिळतात म्हणून मित्रांना आणि नातेवाईकांना मिळवून देण्यासाठी अनेकांनी आग्रह करून गुंतवणूक करण्यास भाग पाडले. गेल्या काही महिन्यात या स्किममध्ये हजारो लोकांनी आपले पैसे गुंतवले. या कंपनीने महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी शाखा स्थापन केलेल्या असून अचानक या सर्व शाखा बंद पडल्याने गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी गुंतवणूकदारांचे पैसे परत कसे मिळवता येईल या प्रश्नावर लासलगाव येथे नागरिकांची व गुंतवणूकदारांची साधक बाधक चर्चा झाली असून गेल्या दोन-तीन दिवसापासून या गुंतवणुकी बाबतच्या अनेक क्लिप्स सोशल मीडियावर फिरत आहेत. काही वर्षांपूर्वी अटक झालेल्या आणि राज्यभर गुन्हा दाखल झालेल्या संशयित व्यक्तीचे अटक झाल्याची माहिती सोशल मीडियावर फिरत आहे. त्यामुळे या कंपनीचे कमिशन एजंट देखील अडचणीत आले आहेत.
लासलगाव येथे अनेक राष्ट्रीयकृत बँका आणि शासकीय मान्यता प्राप्त बँका असताना देखील अल्पावधीत श्रीमंत होण्याच्या आमिषाने नागरिकांनी सतत या कंपनीत पैसे गुंतवणूक केले आणि याच गुंतवणूकदारांनी कंपनी मार्फत मिळणाऱ्या दहा टक्के कमिशन पोटी अनेक हातावर संसार असणारे गोर गरीब परिवारास देखील या कंपनीत आर्थिक गुंतवणूक करण्यास भाग पाडून या गोरगरिबांना देखील आर्थिक अडचणीत टाकले आहे हा चिंतेचा विषय आहे. या व्यावसायिकांकडून न मिळणारे हे करोडो रुपयांचा आकडा लक्षात घेता गोरगरीब महिला व परिवार यांनी कर्ज काढून दागिने विकून व सोन्या-चांदीचे दागिने गहाण ठेवून गुंतवलेली रक्कम आता परत मिळत नाही हे या गुंतवणूकदारांना समजले आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून लासलगाव येथे अशांतता व आर्थिक अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…