Wednesday, April 23, 2025
Homeदेशअखेर भारत-मालदीवचा वाद मिटला

अखेर भारत-मालदीवचा वाद मिटला

भारताने नेहमीच मालदीवसोबत शेजाऱ्याचे बजावले कर्तव्य

पंतप्रधान मोदींचा मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांना दिलासा

नवी दिल्ली : आज आम्ही परस्पर सहकार्याला धोरणात्मक दिशा देण्यासाठी सर्वसमावेशक आर्थिक आणि सागरी सुरक्षा भागीदारी दृष्टीकोन स्वीकारला आहे. विकासाची भागीदारी हा आमच्या संबंधांचा एक महत्त्वाचा पैलू आहे आणि भारताने नेहमीच मालदीवच्या लोकांच्या हिताला प्राधान्य दिले आहे. भारताने नेहमी आपला शेजारी देश या नात्याने मालदीवबरोबर आपले कर्तव्य निभावले आहे. आज आम्ही संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याच्या विविध पैलूंवर तपशीलवार चर्चा केली. हिंदी महासागर क्षेत्रात स्थिरता आणि समृद्धीसाठी आम्ही एकत्र काम करू. संस्थापक सदस्य म्हणून कोलंबो सिक्युरिटी कॉन्क्लेव्हमध्ये सामील होण्यासाठी मालदीवचे स्वागत आहे. एकता हार्बर प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. मालदीवच्या राष्ट्रीय संरक्षण दलांच्या प्रशिक्षण आणि क्षमता वाढीसाठी आम्ही आमचे सहकार्य सुरू ठेवू, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू हे सध्या मालदीव आणि भारतामधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी आणि द्विपक्षीय संबंध वाढवण्यासाठी भारत दौऱ्यावर आहेत. मोहम्मद मुइज्जू यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. या भेटीसंदर्भात परराष्ट्र मंत्रालयाने माहिती दिली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, भारत-मालदीव या दोन्ही देशामधील संबंधांना पुढे नेण्याचे काम भारत करत आहे. यावेळी भारत-मालदीव द्विपक्षीय संबंधांवर विस्तृत चर्चा झाली. हैदराबाद हाऊसमध्ये झालेल्या भेटीदरम्यान, पंतप्रधान मोदी आणि मुइज्जू यांनी मालदीवमधील हनीमाधू आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन केले. यावेळी मालदीवमध्ये रुपे कार्डद्वारे पेमेंटही सुरू करण्यात आले. मोदी आणि मुइज्जू यांनी पहिला व्यवहार केला.

सागर व्हिजनमध्ये मालदीवचे स्थान महत्वाचे

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, भारत आणि मालदीव या दोन्ही देशामधील संबंध शतकानुशतके जुने आहेत. भारत हा मालदीवचा सर्वात जवळचा शेजारी देश आणि जवळचा मित्र आहे. आमच्या नेबरहुड फर्स्ट पॉलिसी आणि सागर व्हिजनमध्ये मालदीवचे महत्त्वाचे स्थान आहे. शेजारील देशाचे धोरण आणि सागर व्हिजन भारताने नेहमीच मालदीवसाठी प्रथम प्रतिसादाची भूमिका बजावली आहे. सर्वसमावेशक आर्थिक आणि सागरी सुरक्षा भागीदारीमध्ये मालदीवने महत्वाचे व्हिजन स्वीकारले आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले.

पायाभूत सुविधांच्या विकासासाठी मदतीचे आश्वासन

मालदीवमध्ये सुरू असलेल्या भारतीय प्रकल्पांचा संदर्भ देत पंतप्रधान मोदी म्हणाले, विकास हा आमच्या संबंधांचा एक महत्त्वाचा पैलू आहे आणि आम्ही नेहमीच मालदीवच्या लोकांच्या हिताला प्राधान्य दिले आहे. मालदीवच्या आवश्यकतेनुसार आज ४०० मिलियन अमेरिकन डॉलर्सच्या चलन स्वॅप करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. भारत आणि मालदीव मुक्त व्यापार करारावरदेखील चर्चा सुरू आहेत. आम्ही मालदीवमधील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी तयार आहोत. आज भारताच्या सहकार्याने बांधलेल्या ७०० हून अधिक सामाजिक गृहनिर्माण युनिट्स सुपूर्द करण्यात आल्या आहेत.

मालदीच्या मालदीवच्या गरजेच्या वेळी भारत पाठीशी उभा राहिला

मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू हे सध्या भारत दौऱ्यावर आहेत. यावेळी मोहम्मद मुइज्जू यांची आणि पंतप्रधान मोदींची भेट झाली. यावेळी मोहम्मद मुइज्जू यांनी पंतप्रधान मोदींना मालदीवला भेट देण्याचे निमंत्रण दिले. यावेळी मोहम्मद मुइज्जू म्हणाले, ‘आमच्या नवीन सर्वसमावेशक व्हिजन डॉक्युमेंटमध्ये विकास, सागरी सुरक्षा, व्यापार भागीदारी, ऊर्जा प्रकल्प, आरोग्य इत्यादींचा समावेश आहे. मी पंतप्रधान मोदींना मालदीव भेटीसाठी आमंत्रित करू इच्छितो. मालदीवला दिलेल्या मदतीबद्दल, विशेषत: अलीकडील अर्थसंकल्पीय मदतीबद्दल मी पंतप्रधान मोदींचे आभार मानू इच्छितो. मालदीवच्या गरजेच्या वेळी भारत त्यांच्या पाठीशी उभा राहिला’, असे मोहम्मद मुइज्जू यांनी म्हटले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -