सध्या मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू (Mohamed Muizzu) भारत दौऱ्यावर आले आहेत. यादरम्यान, आज मुइज्जू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Narendra Modi) भेट घेतली. हैदराबादमधील हाऊसमध्ये झालेल्या भेटीदरम्यान, मुइज्जू आणि पीएम मोदी यांनी मालदीवमधील हनीमाधू आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन केले. यावेळी रुपे कार्डद्वारे पेमेंटही मालदीवमध्ये सुरू करण्यात आले. मोदी आणि मुइज्जू यांनी पहिला व्यवहार केला.
दोन्ही नेत्यांनी हैदराबाद हाऊसमध्ये बैठकीनंतर संयुक्त निवेदन जारी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “भारत आणि मालदीवमधील संबंध शतकानुशतके जुने आहेत. मालदीवचा भारत हा सर्वात जवळचा आणि शेजारी मित्र आहे. आमच्या नेबरहुड फर्स्ट पॉलिसी आणि सागर व्हिजनमध्ये मालदीवचे महत्त्वाचे स्थान आहे. आम्ही संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याच्या विविध पैलूंवर तपशीलवार चर्चा केली. एकता हार्बर प्रकल्पावर वेगाने काम सुरू आहे. हिंदी महासागर क्षेत्रात स्थिरता आणि समृद्धीसाठी आम्ही एकत्र काम करू.”
मालदीवमध्ये सुरू असलेल्या भारतीय प्रकल्पांचा संदर्भ देत पीएम मोदी म्हणाले, “आज परस्पर सहकार्याला धोरणात्मक दिशा देण्यासाठी सर्वसमावेशक आर्थिक आणि सागरी सुरक्षा भागीदारी दृष्टीकोन आम्ही स्वीकारला आहे. आमच्या संबंधांचा एक महत्त्वाचा पैलू विकास आहे आणि आम्ही नेहमीच मालदीवच्या लोकांच्या हिताला प्राधान्य दिल आहे. आज ४०० मिलियन अमेरिकन डॉलर्सच्या चलन स्वॅप करारावर मालदीवच्या आवश्यकतेनुसार स्वाक्षरी करण्यात आली आहे. भारत आणि मालदीव मुक्त व्यापार करारावरदेखील चर्चा सुरू आहेत. आम्ही मालदीवमधलया पायाभूत सुविधांच्या विकासासाठी तयार आहोत. सामाजिक गृहनिर्माण युनिट्स आज भारताच्या सहकार्याने बांधलेल्या ७०० हून अधिक सुपूर्द करण्यात आल्या आहेत.”
पीएम मोदी म्हणाले, “आमच्या नेबरहुड फर्स्ट धोरणात आणि “सागर” व्हिजनमध्ये मालदीवचेही महत्त्वाचे स्थान आहे. मालदीवसाठी भारताने नेहमीच प्रथम प्रतिसादाची भूमिका बजावली आहे. मालदीवच्या लोकांच्या जीवनावश्यक वस्तूंच्या गरजा पूर्ण करणे असो, नैसर्गिक आपत्तीच्या काळात पिण्याचे पाणी पुरवणे असो किंवा कोविडच्या काळात लस पुरवणे असो, आपला शेजारी म्हणून भारताने नेहमीच आपली महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडली आहे.”
दरम्यान, यावेळी पीएम मोदींना मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइझू यांनी मालदीव दौऱ्याचे निमंत्रण दिले आहे. ते म्हणाले, “आमच्या नवीन सर्वसमावेशक व्हिजन डॉक्युमेंटमध्ये विकास, सागरी सुरक्षा, व्यापार भागीदारी, ऊर्जा प्रकल्प, आरोग्य इत्यादींचा समावेश आहे. मी मालदीव भेटीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आमंत्रित करू इच्छितो. मालदीवच्या गरजेच्या वेळी भारत त्यांच्या पाठीशी उभा आहे. मालदीवला दिलेल्या मदतीबद्दल, विशेषत: अलीकडीच्या अर्थसंकल्पीय मदतीबद्दल मी पंतप्रधान मोदी आणि सरकारचे खूप खूप आभार मानतो.”
मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…
अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…
पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…
पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…