भुयारी मेट्रोत पहिल्याच दिवशी बिघाड; दरवाजे लॉक झाल्याने प्रवाशांचा खोळंबा

मुंबई : भुयारीमेट्रोमध्ये पहिल्याच दिवशी तांत्रिक बिघाड झाला आहे. सोमवारी सकाळी मेट्रो सुरू होताच तांत्रिक बिघाड झाला. पाच ते सात मिनिटे मरोळ स्थानकावरतीच रखडली होती. दरवाजे बंद झाले होते, त्यामुळे प्रवाशांचा सुद्धा चांगलाच खोळंबा झाला. सकाळी अकरा वाजता ही मेट्रो सुरू झाली.


अशा प्रकारे बहुप्रतीक्षित अशी संपूर्ण भुयारी मेट्रो ३ मार्गिका अखेर मुंबईकरांना प्रवासासाठी खुली झाली. सोमवारी मेट्रो ३ची पहिली गाडी आरे येथून सकाळी ११ वाजता सुटली. आजपासून मात्र सकाळी ६.३० वाजल्यापासून ही मेट्रो सेवा सुरू होईल. मेट्रा ३ ही एकूण मार्गिका ३३.५ किमीची असली तरी आरे ते बीकेसी हा पहिला टप्पा १२.६९ किमी अंतराचा आहे. या टप्प्यात दहा स्थानके आहेत. ताशी ९५ किमी इतका या मेट्रोचा वेग आहे. त्यामुळे आरे ते बीकेसी हा प्रवास आता केवळ २२ मिनिटांत करता येणार आहे.


रोज सकाळी ६.३० ते रात्री १०.३० वाजेपर्यंत मेट्रो-३ची सेवा सुरू राहील. सुट्टीच्या दिवशी सकाळी ८.३० वाजता मेट्रो सेवा सुरू होईल. रोज ९६ फेऱ्या चालवल्या जातील. दर ६ मिनिटे ४० सेकंदांनी मेट्रो सोडली जाईल. किमान १० रुपये ते कमाल ५० रुपये तिकीट दर असेल. आरे ते कफ परेड संपूर्ण मार्गिका सुरू झाल्यानंतर मात्र तिकीटदर आणि फेऱ्यांच्या संख्येत बदल होईल. संपूर्ण मार्गिकेसाठी कमाल तिकीट दर ७० रुपये असेल. ३० ऑक्टोबरपर्यंत एकात्मिक तिकीट प्रणाली उपलब्ध होईल. यामुळे सर्व मेट्रो मार्गिकांवर एकाच तिकिटाद्वारे प्रवास करता येईल. पहिल्या टप्प्यातील मेट्रो ३ मार्गिका मेट्रो १ मार्गिकला मरोळ नाका येथे जोडेल.

Comments
Add Comment

पश्चिम रेल्वेवर आज - उद्या 'मेजर ब्लॉक'

लोकलसह एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल मुंबई  : पश्चिम रेल्वेवर परिचालन कार्य आणि प्रभादेवी रोड ओव्हर

गॅसनंतर आता 'पाणी'ही महाग?

बाटलीबंद पाण्याच्या दरात घाऊक बाजारात वाढ मुंबई  : इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे

मराठी न शिकवणाऱ्या शाळांची मान्यता रद्द होणार

मुंबई : राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणे बंधनकारक आहे. एखाद्या शाळेत मराठी शाळा शिकवली

सफाईच्या कामांचे ऑडिट करण्यासाठी आयआयटी मुंबईची मदत घेणार

मुंबई: मुंबईतील नालेसफाईच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असून ज्याठिकाणी मिठी नदीच्या कामासाठी नव्याने निविदा

महापालिका शालेय वस्तूंच्या खरेदीसाठी आता जेम पोर्टलवरून निविदा

मुंबई: मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये वितरीत केल्या जाणाऱ्या २७ शालेय वस्तूंची खरेदीची प्रक्रिया रद्द करून

महालक्ष्मी येथे लहान प्राणी, पक्ष्यांच्या मृतदेहांवर अंत्यविधीची सुविधा; लहान पाळीव प्राण्यांचे रुग्णालय लवकरच होणार सुरू

मुंबई: मुंबई महानगरपालिका आणि टाटा ट्रस्ट संचालित लहान प्राण्यांच्या रुग्णालयात लहान प्राणी व पक्ष्यांच्या