अमरावतीत पोलीस स्टेशनवर दगडफेक, १० ते १२ पोलीस जखमी!

  103

पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराचे नळकांडे फोडले


अमरावती : अमरावती येथील नागपुरी गेट पोलिस ठाण्यात निवेदन देण्यासाठी आलेला जमाव हिंसक बनल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. हिंसक जमावाने केलेल्या गदडफेकीत १० ते १२ पोलीस जखमी झाले. यानंतर जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज आणि अश्रुधुराचा वापर केला. या घटनेनंतर शहरात तणावपूर्ण वातावरण आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, गाझीयाबादमधील महंत यतिनरसिंहानंद यांनी मुस्लीम धर्मगुरुबाबात केलेल्या वक्तव्यामुळे धार्मिक भावना भडकविल्याचा आरोपावर एफआयआर दाखल करण्याची मागणी करत, मुस्लीम समाजाचा एक गट नागपुरी गेट पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देण्यासाठी पोहोचला. मात्र त्यानंतर अचानक काही आक्रमक लोकांच्या जमावाने पोलिस स्टेशनवर दगडफेक सुरु केली आणि वातावरण तापले. पोलिसांनी रोखण्याचाप्रयत्न केला असता जमाववाढत गेला आणि पुन्हा पोलिस स्टेशनवर दगडफेक सुरु झाली. यामध्ये १० ते १२ पोलीस जखमी झाले. तर पोलिसांच्या एका गाडीची तोडफोड करण्यात आली. जमाव वाढत असल्याचे पाहून तत्काळ या ठिकाणी पोलिसांचा प्रचंड फौजफाटा जमा झाला आणि जमावाला पांगविण्यासाठी लाठीचार्ज आणि अश्रुधुराचे नळकांडे फोडण्यात आले. रात्री उशिरापर्यंत जमावाला पांगविण्याची कारवाई सुरु होती.


सध्या परिसरात सीपी नवीनचंद्र रेड्डीं, डीसीपी, एसीपींसह १२०० हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच स्थिती नियंत्रणात राहावी म्हणून जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहे. यासोबत धार्मिक स्थळावरून सुद्धा लोकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले.

Comments
Add Comment

निरोप समारंभात गाणे गाणं महागात पडलं, तहसीलदार प्रशांत थोरात यांचे तात्काळ निलंबन

नांदेड: तहसीलदार प्रशांत थोरात नांदेड जिल्ह्यातील उमरी येथे कार्यरत होते. गेल्या महिन्यात त्यांची बदली लातूर

गुहागर : चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी १५० गाड्यांचं बुकिंग

गुहागर आगारातून जास्तीत जास्त चाकरमान्यांना एसटी महामंडळाची सेवा दिली जात असून आतापर्यंत परतीच्या

दापोली : मुसळधार पाऊस, खेड-दापोली रस्ता बंद, असोंडमध्ये रस्ता वाहून गेला

दापोली तालुक्यातील वाकवली–उन्हावरे मुख्य रस्त्यावर असणाऱ्या असोंड गावातील एसटी स्टँडवरून कुंभारवाडीकडे

इस्लामपूरचे नामांतर ईश्वरपूर करताना 'उरुण' चा समावेश करण्याबाबत जयंत पाटील यांचे राज्यपालांकडे निवेदन

सांगली: सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील उरुण इस्लामपूर शहराचे नाव 'ईश्वरपूर' करण्याची घोषणा शासनाने

चिपळूण, खेड, दापोलीत मुसळधार पाऊस, पाहा कोकणातील पावसाचे अपडेट

गेल्या दोन दिवसापासून रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून, नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे,

किनारपट्टीला ‘एरिन’ चक्रीवादळाचा धोका, हवामान विभागाचा अलर्ट

राज्यात अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाने तडाका दिलाय. अटलांटिक महासागरातून येणारे ‘एरिन’ चक्रीवादळ आता वेगाने