Wednesday, April 30, 2025

क्रीडाताज्या घडामोडी

T-20 world cup: वर्ल्डकपमध्ये आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सामना

T-20 world cup: वर्ल्डकपमध्ये आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सामना

मुंबई: सध्या सुरू असलेल्या महिला टी-२० वर्ल्डकप २०२४मध्ये(T-20 world cup) आज ४ ऑक्टोबरला भारतीय महिला संघाचा पहिला सामना आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात टीम इंडिया या टी-२० वर्ल्डकपमध्ये विजयासह सुरूवात करण्याचा प्रयत्न करेल. दोन्ही संघादरम्यान हा सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये होणार आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळवला जाणारा हा स्पर्धेतील चौथा सामना असेल. टीम इंडियासह न्यूझीलंडचाही स्पर्धेतील पहिलाच सामना असेल. भारतीय वेळेनुसार सामन्याची सुरूवात संध्याकाळी साडेसात वाजता होईल.

कुठे बघाल लाईव्ह?

भारत आणि न्यूझीलंड महिला संघादरम्यानचा हा सामना स्टार स्पोर्ट्सवर तुम्ही पाहू शकता. तसेच हॉटस्टारवरही या सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग होईल.

टी-२० वर्ल्डकपसाठी महिला संघ

शेफाली वर्मा, स्मृति मंधाना, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमा रोड्रिग्स, ऋचा घोष (विकेटकीपर), दीप्ति शर्मा, पूजा वस्त्रकार, श्रेयंका पाटिल, अरुंधति रेड्डी, राधा यादव, रेणुका ठाकुर सिंह, दयालन हेमलता, एस सजना, यास्तिका भाटिया, आशा शोभना.

Comments
Add Comment