Navratri: नवरात्रीत उपवास करताय तर जरूर लक्षात ठेवा या टिप्स

  99

मुंबई: हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक म्हणजे नवरात्री. आजपासून शारदीय नवरात्रीला सुरूवात होत आहे. यानंतर ९ दिवसा दुर्गा मातेच्या विविध रूपांची पुजा केली जाते. यावेळी नवरात्रीत अनेकजण उपवास करतात. नवरात्रीत उपवास करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते मात्र या दरम्यान काही खबरदारीही घेतल पाहिजे. थोडीशी जरी बेफिक्री केली तर आरोग्य बिघडवू शकते.

योग्य पद्धतीने उपवास केला की बॉडी डिटॉक्स होते आणि पोटही रिलॅक्स होते. फास्टिंगमुळे वजनही नियंत्रणात येते. दरम्यान, अधिक काळ उपाशी राहिल्यानेही आरोग्यास नुकसान पोहोचू शकते. यामुळे अॅसिडिटी, अशक्तपणा, डोकेदुखी या समस्या होऊ शकतात.

त्यामुळे तुम्हीही जर नवरात्रीत उपवास करत असाल तर खालील टिप्सचा जरूर वापर करा.

नवरात्रीत उपवास करत असाल तर शरीर भरपूर हायड्रेट ठेवण्याचा प्रयत्न करा. दिवसभरात २-३ लीटर पाणी प्या. स्वत:ला हायड्रेट ठेवल्याने शरीरात इलेक्ट्रोलाईट बॅलन्स राहते आणि त्रास होत नाही.

उपवास करताना भरपूर फळे खा. तसेच ड्रायफ्रुट्सचे सेवन करा. असे केल्याने शरीरात पोषकतत्वांची कमतरता भासत नाही. तसेच अशक्तपणाही जाणवणार नाही

नवरात्रीत प्रोटीन फूड्स जसे पनीर, दही आणि बदाम सारखे पदार्थ खात राहा. दरम्यान, प्रोटीन पचण्यास वेळ लागतो. यामुळे दीर्घकाळ पोट भरलेले राहते.

उपवासादरम्यान तळलेले पदार्थ खाऊ नका. त्याऐवजी भाजलेल्या पदार्थांचे सेवन करू शकता. तळलेले पदार्थ शरीरास नुकसान पोहोचवतात.

नवरात्रीत उपवास करता एक गोष्ट जरूर लक्षात ठेवा की अधिक काळ पोट रिकामे राहता कामा नये. दर २-३ तासांनी काही ना काही खात राहा. असे केले नाही तर तुम्हाला अॅसिडिटी, डोकेदुखीसारख्या समस्या होऊ शकतात.

Comments
Add Comment

Health: हे वाचल्यानंतर तुम्ही दररोज पोळीला तूप लावून खाल

मुंबई: भारतीय जेवणात पोळीला तूप लावून खाणे ही जुनी परंपरा आहे. अनेक वर्षांपासून ही पद्धत चालत आलेली आहे, पण केवळ

मुलांची उंची वाढवण्यासाठी आणि हाडे मजबूत करण्यासाठी त्यांना द्या हा पौष्टिक आहार

मुंबई: मुलांची वाढ योग्य प्रकारे व्हावी यासाठी त्यांना पौष्टिक आहार देणे खूप महत्त्वाचे असते. चांगल्या उंचीसाठी

Hair Care: केस गळती रोखण्यासाठी तसेच घनदाट केसांसाठी खा हे ७ सुपरफूड्स

मुंबई: हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात आणि बदलत्या आहारामुळे केस गळण्याची समस्या खूप सामान्य झाली आहे. अनेकजण या

Skin Care: पावसाळ्यात त्वचा आणि केसांसाठी वरदान ठरतो कडुलिंब

मुंबई: पावसाळा सुरू झाला की, वातावरणातील ओलावा आणि आर्द्रता वाढते. यामुळे त्वचे

Health: चुकीच्या पद्धतीने 'हेल्दी फूड' खाण्याचे गंभीर दुष्परिणाम

मुंबई: अनेकदा आपण आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाणारे पदार्थ चुकीच्या पद्धतीने खातो, ज्यामुळे त्याचे फायदे

Rakshabandhan: यंदाच्या रक्षाबंधनाला द्या चॉकलेटी टच, बनवा हे घरगुती केक आणि ब्राऊनी

मुंबई: रक्षाबंधन २०२५ जवळ येत असताना, मिठाई आणि गोड पदार्थांची तयारी सुरू झाली आहे. यावर्षी तुम्ही तुमच्या