Mumbai Local : पश्चिम रेल्वेचे नवे वेळापत्रक जारी; 'या' तारखेपासून सुरु होणार १२ नव्या फेऱ्या!

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) उपनगरीय लोकल सेवेचं नवं वेळापत्रक १२ ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. या अंतर्गत १२ नव्या फेऱ्यांची सुरुवात होणार आहे. सध्या सुरु असलेल्या ६ फेऱ्यांसह १० लोकल गाड्यांचे डबे १२ ऐवजी १५ करण्यात येणार आहेत. त्यामुळे एकूण फेऱ्यांची संख्या १३९४ वरून १४०६ वर जाणार आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिली.



नव्या फेऱ्यांचा समावेश



  • विरार ते चर्चगेट : एक फास्ट लोकल

  • डहाणू रोड ते विरार : दोन स्लो लोकल

  • अंधेरी, गोरेगाव, बोरिवली ते चर्चगेट : एक स्लो लोकल

  • चर्चगेट ते नालासोपारा : एक फास्ट लोकल

  • चर्चगेट ते गोरेगाव : दोन स्लो लोकल

  • चर्चगेट ते अंधेरी : एक स्लो लोकल

  • विरार ते डहाणू रोड : दोन स्लो लोकल


सहाव्या मार्गिकेचं काम अंतिम टप्प्यात


पश्चिम रेल्वेने मालाड स्थानकापर्यंत सहाव्या मार्गिकेचं काम अंतिम टप्प्यात आणलं आहे. या मार्गिकेच्या उभारणीसाठी राम मंदिर ते मालाड स्थानकादरम्यान लोकल गाड्यांचा वेग तात्पुरता ३० किमी प्रतितास करण्यात आला आहे. या कामामुळे दररोज १५० लोकल फेऱ्या ४ ऑक्टोबरपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. सहावी मार्गिका पूर्ण झाल्यानंतर लोकलचा वेग पूर्ववत होईल.



भविष्यातील सुधारणा


पश्चिम रेल्वेने गोरेगाव ते कांदिवली दरम्यान सहावी मार्गिका उभारण्याचे काम देखील हाती घेतले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर लोकल सेवेच्या कार्यक्षमतेत आणखी सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. मुंबईतील पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांना अधिक सोयीस्कर आणि जलद प्रवासाचा अनुभव मिळावा, यासाठी हे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

संगीत साधनेच्या २० वर्षांचा उत्सव - १३६ वी प्रातःस्वर मैफल

प्रत्येक मैफलीत नवा कलाकार अशी संकल्पना मुंबई : भारतीय शास्त्रीय संगीताच्या संवर्धन व प्रचारासाठी गेली दोन

‘इंग्रजी’ भाषेत नामनिर्देशनपत्र, शपथपत्र भरण्याची मुभा

राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्तांना पत्र मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मराठीबरोबरच इंग्रजी भाषेतही

३०७ वर्षे नाताळ साजरा करणारे मुंबईतील ‘कॅथेड्रल’

चर्च आकर्षक रोषणाई आणि सजावटीने उजळले ‘चर्चगेट’ मुंबई : मुंबईत आणि उपनगरात सध्या नाताळनिमित्त उत्साहाचे

स्वबळाची भाषा करणाऱ्यांकडे उमेदवारांचा दुष्काळ

काँग्रेसकडे मुंबईतील ३० प्रभागांमध्ये एकही इच्छुक नाही उत्तर मुंबईत उमेदवार शोधण्यासाठी करावी लागणार

१६ जानेवारीला मुंबई जिंका; अटलजींना तीच खरी आदरांजली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन मुंबई : “अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा' हे अटलजींचे उद्गार

सागराचे आव्हान आणि करिअर संधी

सुरेश वांदिले मुंबईमध्ये २७ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘मेरीटाइम वीक’ ही आतंरराष्ट्रीय परिषद पार पडली.