PM Narendra Modi : पंतप्रधानांकडून महात्मा गांधी व शास्त्रींना अभिवादन

नवी दिल्ली : महात्मा गांधी (Mahatma Gandhi) आणि देशाचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री (Lal Bahadur Shastri) यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आदरांजली अर्पण केलीय. यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर फोटोसह श्रद्धांजली संदेश जारी केला आहे.


गांधींच्या १५५ व्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी राजघाट येथे जाऊन त्यांच्या समाधीस्थळी अभिवादन केले. यासंदर्भातील संदेशात पंतप्रधान म्हणाले की, सर्व देशवासियांच्या वतीने आम्ही आदरणीय बापूंना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो. सत्य, समरसता आणि समतेवर आधारित त्यांचे जीवन आणि आदर्श देशवासीयांसाठी नेहमीच प्रेरणादायी राहतील असे त्यांनी आपल्या संदेशात नमूद केले आहे. यासोबतच मोदींनी माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनाही श्रद्धांजली वाहिली.


विजय घाट या शास्त्रींच्या समाधीस्थळी पुष्पांजली अर्पण करून शास्त्रींना अभिवादन केल्यानंतर पंतप्रधान म्हणाले की, 'माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. त्यांनी देशाचे सैनिक, शेतकरी आणि स्वाभिमानासाठी आपले जीवन समर्पित केल्याचे पंतप्रधानांनी म्हंटले आहे. यासोबतच विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देखील महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन केले.

Comments
Add Comment

'ATAGS' artillery gun is ready : १५ सेकंदात ३ हल्ले आणि ४८ किमीचा अचूक पल्ला; चीन-अमेरिकाही चकित

नवी दिल्ली: रणांगणावर भारताच्या सं

Delhi-Pune SpiceJet Flight : दिल्ली - पुणे विमानात तांत्रिक बिघाड; प्रवाशांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!

नवी दिल्ली : दिल्लीहून पुण्याकडे येणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानात उड्डाणापूर्वी तांत्रिक बिघाड झाल्याची घटना

Actor Prakash Raj : अभिनेते प्रकाश राज यांचा SIR वरचा दावा खोटा? निवडणूक आयोगाने दाखवला BLOचा व्हिडिओ; म्हणाले "जुन्या पत्त्यावर..."

नवी दिल्ली : अभिनेता प्रकाश राज (Actor Prakash Raj) आपल्या वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत असतात. आता कर्नाटकमधील Special Intensive Revision (SIR)

Jharkhand : पोलिसांच्या दडपशाहीविरोधात झारखंड बंद

रांची : झारखंडमध्ये स्पर्धा परीक्षांमधील कथित अनियमिततेविरोधात निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या

Arunachal Pradesh : "अरुणाचल हा भारताचा अविभाज्य भाग", चीनच्या आक्षेपाला भारताचे चोख प्रत्युत्तर

नवी दिल्ली : भारताने गेल्या आठवड्यात आपल्या अधिकृत नकाशावर अरुणाचल प्रदेशातील २७ ठिकाणे आणि भौगोलिक

Vande Mataram Law : ‘वंदे मातरम्’ला राष्ट्रगीताप्रमाणेच कायदेशीर संरक्षण, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मंजुरीने ऐतिहासिक विधेयकाचे कायद्यात रूपांतर

नवी दिल्ली: राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’चा अवमान करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई केली जाणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी