मुंबई: शरीरात खराब कोलेस्ट्रॉल वाढले तर हृदयाच्या आजारांचा धोका वाढतो. अशातच लोक यासाठी खराब लाईफस्टाईलला जबाबदार ठरवतात. अनियमित खाणे-पिणे, जंक फूड, दारूचे अधिक सेवन आणि व्यायामाच्या कमतरतेमुळे खराब कोलेस्ट्रॉल वेगाने वाढते. मात्र तुम्हाला माहीत आहे का की केवळ खराब लाईफस्टाईलच कोलेस्ट्रॉल वाढण्यासाठी कारणीभूत नाही.
खराब कोलेस्ट्रॉल व्हिटामिन बी ३ म्हणजेच नियासिनच्या कमतरतेमुळेही वाढते. जाणून घेऊया कोलेस्ट्रॉलमध्ये व्हिटामिन बी ३ कसे काम करते. व्हिटामिन बी ३ म्हणजेच नियासिन आरोग्यासाठी अतिशय गरजेचे आहे. हे व्हिटामिन तुम्हाला आहारातून मिळते. मात्र याचे पुरेसे प्रमाण न मिळाल्याने गंभीर स्थिती निर्माण होऊ शकतात.
व्हिटामिन बी ३चा वापर कोलेस्ट्रॉल आणि हृदयरोगाची जोखीम कमी करण्यासाठी केला जातो. याचा रक्तदाबावर परिणाम होता. व्हिटामिन बी ३ एचडीएल म्हणजेच चांगले कोलेस्ट्रॉल वाढवतो आणि ट्रायग्लिसराईड कमी करते.
आपल्या आहारात व्हिटामिन बी ३ ने भरपूर खाद्य पदार्थ जसे चिकन, टर्की, टूना, मशरूम, ब्राऊन राईस आणि शेंगदाणे यांचा समावेश करावा. आपल्या आहारात नियासिनयुक्त पदार्थांचे नियमित सेवन केल्याने खराब कोलेस्ट्रॉल वाढत नाही.
मुंबई : इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने होते.…
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…
मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…
तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…
बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…