मुंबई-पुणे महामार्गावरील बसमध्ये दिसणार आता ‘शिवनेरी सुंदरी’

हवाई सेवेच्या धर्तीवर एसटी महामंडळ अध्यक्ष भरत गोगावलेंची घोषणा


मुंबई : मुंबई- पुणे महामार्गावर धावणाऱ्या एसटीच्या ई-शिवनेरी बसमध्ये प्रवाशांना मदत करण्यासाठी हवाई सेवेच्या धर्तीवर आदरातिथ्य व्यवस्थापनाची सेवा देणारी परिचारिका (शिवनेरी सुंदरी) नेमण्यात येणार आहे. मात्र यामुळे प्रवाशांच्या तिकिटावर कोणताही अधिभार न लावता प्रवाशांना चांगल्या सेवा सुविधा देऊन गुणात्मक सेवेचा दर्जा उंचावेल अशी अभिनव योजना भविष्यात सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी महामंडळाच्या ३०४ व्या बैठकीमध्ये दिली.


एसटी महामंडळाचे नवे अध्यक्ष भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली ३०४ वी संचालक मंडळाची बैठक मंगळवारी पार पडली. या बैठकीमध्ये विविध खात्याच्या तब्बल ७० पेक्षा जास्त विषयांवर चर्चा होऊन त्यांना मान्यता देण्यात आली. त्यापैकी मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या ई-शिवनेरी बसमध्ये प्रवाशांना मदत करण्यासाठी परिचारिका नेमण्यास मान्यता देण्यात आली आहे.


महामंडळाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील स्वर्गीय आनंद दिघे यांच्या स्मरणार्थ एसटीच्या ३४३ बस स्थानकांवर ‘आनंद आरोग्य केंद्र’ या नावाने दवाखाना सुरू करण्यात येणार असून, अत्यंत माफक दरामध्ये बस स्थानकांवरील प्रवाशांबरोबरच आसपासच्या सर्व नागरिकांना कमी दरामध्ये विविध आरोग्य चाचण्या व औषधे एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी संबंधित संस्थांना बसस्थानकांवरील ४०० ते ५०० चौ.सेमी. ची जागा उपलब्ध करून देण्यात येईल. तेथे त्या संस्थेने आरोग्य तपासणी दवाखाना, पॅथॉलॉजी लॅब व औषध दुकान सुरू करून सेवा द्यावयची आहे.


आगारांची संख्या २५३ होणार


चंद्रपूर जिल्ह्यातील मूल व अमरावती जिल्ह्यातील धारणी या आदिवासी बहुल प्रदेशांमध्ये एसटीचे नवे आगार निर्माण करण्यात येणार असून या आगाराच्या निर्मितीनंतर एसटीच्या एकूण आगारांची संख्या २५३ होणार आहे.


महिला बचत गटांना स्टॉल उघडण्यास जागा


एस. टी. महामंडळाच्या प्रत्येक बस स्थानकांवर त्या परिसरातील महिला बचत गटांना आपले स्थानिक पदार्थ विक्री करण्यासाठी चक्रीय पद्धतीने नाममात्र भाडे आकारुन १०X१० आकाराचा स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. तसेच नवीन २५०० साध्या बसेस खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया सुरू करणे तसेच १०० डिझेल बसेसचे प्रायोगिक तत्त्वावरील इलेक्ट्रिक बसमध्ये रूपांतर करणे अशा विविध विषयांना या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली. या बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार व एसटी महामंडचे सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.

Comments
Add Comment

अमरावतीत सलग २५ तासांत १५ हजार ७७३ डोसे !

विख्यात शेफ विष्णू मनोहर यांचा विक्रम अमरावती : विख्यात शेफ विष्णू मनोहर यांनी अमरावती शहरात सलग २५ तासांत एकूण

घोडबंदर रोडवर भीषण अपघात; एका महिलेचा जागीच मृत्यू, दुचाकीचालक गंभीर जखमी

ठाणे : घोडबंदर वाहिनीवरील विजय गार्डन स्काय वॉक ब्रिजखाली, रविवार रात्री

प्रत्येक जिल्हा परिषद सर्कलमध्ये ५१ टक्के मतांचा संकल्प करा - बावनकुळे

नागपूर : आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत प्रत्येक सर्कल मध्ये ५१ टक्के मते मिळतील असा संकल्प करा, असे आवाहन

मुंबईसह विविध ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश

ठाणे : मुंबईतील वाकोला प्रभाग क्रमांक ९१ चे उबाठा गटाचे माजी नगरसेवक सगुण नाईक त्यांची कन्या युवासेना कॉलेज कक्ष

पावणेचार वर्षात राज्यात ६७९ वाघ आणि बिबट्यांचा मृत्यू, अपघाताने २३ वाघांचा मृत्यू

चंद्रपूर : मागील पावणेचार वर्षात राज्यात ६७९ वाघ आणि बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. त्यात नैसर्गिक मृत्यू असले तरी,

शनिवार वाड्यावर नमाज पठण, निषेधासाठी भाजपच्या नेतृत्वात हिंदुत्ववाद्यांचे आंदोलन

पुणे : शनिवार वाड्यात नमाज पठण झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून