मुंबई: मलायका अरोरावर सध्या दु:खाचा डोंगर कोसळला आहे. वडिलांच्या निधनानंतर संपूर्ण अरोरा कुटुंबीय दु:खात आहेत. वडील अनिल मेहता यांचे निधन झाल्यानंतर मलायका सोशल मीडियावर काही पोस्ट शेअर करत नव्हती. या दु:खातून बाहेर येण्यासाठी मलायका वेळ घेत आहे. नव्या महिन्यासह तिने नव्या आशा जागवल्या आहेत. तिने सोशल मीडियावर वडिलांच्या निधनानंतर पहिली पोस्ट शेअर केली आहे.
मलायकाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर केली आहे. तिचा जन्मदिवस ऑक्टोबरमध्ये येतो आणि तिची रास वृश्चिक आहे. मलायका आशा करत आहे की तिचा हा महिना चांगला जाईल.
मित्रांनी दिली साथ
मलायका अरोरा आणि तिची बहीण अमृता अरोरा यांच्या कठीण काळात त्यांच्या मित्रांनी खूप साथ दिली. तिची बेस्टफ्रेंड करीना कपूर आणि करिश्मा याही कठीण काळात त्यांच्यासोबत आहेत. दोघीही त्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी घरी येत जात होत्या.
अर्जुन कपूरचीही साथ
मलायला अरोराला यावेळी अर्जुन कपूरही सांभाळताना दिसला. रिपोर्टनुसार हे दोघेही वेगळे झाले आहेत. मात्र वडिलांच्या निधनानंतर तो मलायकाला सांभाळताना दिसला.