Monday, April 21, 2025
Homeताज्या घडामोडीLPG Cylinder: सणासुदीआधी गॅस सिलेंडर महागला, इतक्या रुपयांची वाढ

LPG Cylinder: सणासुदीआधी गॅस सिलेंडर महागला, इतक्या रुपयांची वाढ

मुंबई: ऑक्टोबर महिना हा सणासुदींचा महिना असतो. या महिन्यात नवरात्र, दसरा, दिवाळी या सणांची रेलचेल आहे. दरम्यान, या सणासुदीच्या महिन्याच्या पहिल्याच तारखेला गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. गॅस किंमतीमध्ये ही वाढ १९ किलोग्रॅमच्या कमर्शियल सिलेंडरमध्ये झाली असून ४८.५० रूपये प्रति सिलेंडर झाली आहे. एलपीजी सिलेंडरचे नवे दर आज १ ऑक्टोबर २०२४ पासून देशभरात लागू करण्यात आले आहेत.

देशाची राजधानी दिल्लीमध्ये १९ किलोग्रॅमच्या एलपीजी सिलेंडरचे दर आता १७४० रूपये झाले आहेत. यात ४८.५० रूपयांची वाढ करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात हे भाव १६९१.५० रूपये इतके होते.

कोलकातामध्ये १९ किग्रॅमच्या सिलेंडरचे दर आता १८५०.५० रूपये झाले आहेत. यात ४८ रूपयांची वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात हे दर १८०२.५० रूपये इतके होते.

मुंबईत एलपीजी सिलेंडरचे दर आता १६९२ रूपये झाले आहेत. यात ४८ रूपयांची वाढ झाली आहे. सप्टेंबर महिन्यात हे दर १६४४ रूपये होते.

चेन्नईत १९ किग्रॅच्या सिलेंडरचे दर आता १९०३ रूपये झाले आहेत. यात ४८ रूपयांची वाढ झाली आहे. सप्टेंबर महिन्यात हे दर १८५५ रूपये होते.

दरम्यान, सामान्य गृहिणी वापरत असलेल्या १४.२ किग्रॅ वजनाच्या सिलेंडरच्या दरात कोणतेही बदल झालेले नाहीत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -