Monday, May 19, 2025

विदेशमहत्वाची बातमी

इस्त्रायलच्या हवाई हल्ल्यामुळे लेबनानमध्ये ४५ जणांचा मृत्यू, ७८ जखमी

इस्त्रायलच्या हवाई हल्ल्यामुळे लेबनानमध्ये ४५ जणांचा मृत्यू, ७८ जखमी

लेबनान: इस्त्रायल आणि लेबनान यांच्यातील संघर्ष अधिकच वाढत चालला आहे. यासंबंधी लेबनानच्या आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली की रविवारी इस्त्रायलच्या सैन्याने दोन विविध ठिकाणी हवाई हल्ले केले. या हल्ल्यामध्ये कमीत कमी ४५ जण मारले गेले तर ७६ जखमी झाले आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार हा हल्ला दक्षिण लेबनानमधील गाव ऐन एल डेल्ब आणि पूर्व लेबनानच्या बेका घाटीमधील बाल्बेक हर्मेल क्षेत्रात करण्यात आला. यात ऐन अल डेल्बमध्ये २४ लोकांचा मृत्यू झाला तर २९ जण जखमी झाले तर बाल्बेक हर्मेलमध्ये २१ लोक मारले गेले तर ४७ जण जखमी झाले.


इस्त्रायलकडून होत असलेल्या बॉम्बहल्ल्यांमुळे हजारो लेबनान नागरिकांना घर सोडून दुसरीकडे पळून जावे लागत आहे. हवाई हल्ल्यात अनेक इमारती नष्ट करण्यात आल्या. इस्त्रायल हे हल्ले हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी करत आहेत. देशाचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी स्पष्ट केले की ते कोणत्याही किंमतीत हे हल्ले रोखणार नाही.



लेबनानमधील मृतांची संख्या


इस्त्रायलच्या हवाई हल्ल्यांमध्ये आतापर्यंत शेकडो जणांचा मृत्यू झाला आहे. तर हजारोंच्या संख्येने लोक जखमी झाले आहेत. आकड्यांनुसार लेबनानमध्ये आतापर्यंत एकूण १६४० लोक मारले गेले आहेत. यात १०४ मुले आणि १९४ महिलांचा समावेश आहे. हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांबाबत बोलायचे झाल्यास हल्ल्यांमध्ये कमीत कमी हिजबुल्लाहचे २० दहशतदवादी ठार झाले.

Comments
Add Comment