मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या(hardik pandya) आणि नताशा स्टेनकोविक(natasha stankovic) यांचा या वर्षी घटस्फोट झाला. हार्दिक आणि नताशा यांचा एक मुलगा अगस्त्याही आहे. नुकतीच पांड्याने घटस्फोटानंतर मुलगा अगस्त्याची पहिली भेट घेतली.
मात्र आता नताशाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात ती स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करताना दिसत आहे. तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट करत सुंदर असे म्हटले आहे. काही युजर्सनी कर ग्लॅमरस अवतार दाखवत पांड्याला जळवत आहे असा सवाल उपस्थित केला आहे.
View this post on Instagram
काही युजर्सनी तर नताशाला जलपरी असे म्हटले आहे. काही युजर्सनी दावा केला आहे की नताशा यावेळेस गोव्यामध्ये फिरत आहे.
हार्दिक पांड्या आणि सर्बियन मॉडेल नताशा स्टेनकोविक यांनी १४ फेब्रुवारी २०२३मध्ये उदयपूर येथे हिंदू आणि ख्रिश्चन या दोन्ही पद्धतीने पुन्हा लग्न केले होते. मात्र या वर्षी जुलैमध्ये पांड्याने एक पोस्ट शेअर करत घटस्फोटाची अधिकृत घोषणा केली होती. त्यांनी सांगितले होते की ४ वर्षे जुने नाते संपत आहे.
घटस्फोटानंतर नताशाने आपला मुलगा अगस्त्याला घेऊन आपल्या घरी सर्बियाला गेली होती. ती नुकतीच मुंबईत परतली आहे. यातच तिचा हा व्हिडिओ समोर आला आहे.