नागपूर : ऑक्टोबरचा पहिला हप्ता दिल्यानंतर जानेवारी महिन्यात पगार द्यायला सरकारच्या तिजोरीत पैसे नसतील. सत्ताधाऱ्यांच्या स्वार्थासाठी योजना तयार केल्या जात असतील तर त्याचा राज्यावर परिणाम होईल. राज्य खड्ड्यात घातलं जात असेल तर हे चुकीचं आहे. महिलांना अशा प्रकारे पैसे न देता राज्यात नवीन उद्योग आणले पाहिजे, रोजगार दिला पाहिजे. समाजातील कोणताही घटक फुकट काही मागत नाही, अशा मुद्द्यांवर महाराष्ट्र मवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना भाष्य केले.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. त्यांनी काल पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्याचा आढावा घेतला. तर आज नागपूर, भंडारी, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्याचा आढावा घेणार आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची राज्यभरात खूप चर्चा आहे. या योजनेत सध्या महिलांच्या तिसरा हप्ता जमा व्हायला सुरूवात झाली आहे. त्यात लाडकी बहीणवरून सत्ताधारी विरोधकांमध्ये राजकारणही पेटले आहे. असे असताना आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेवर भाष्य केले आहे. सत्ताधारी स्वत:च्या स्वार्थासाठी अशा योजना तयार करतायत, अशी टीका राज ठाकरेंनी महायुती सरकारवर केली आहे.
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…