७ दिवसानंतर सुरू होतेय शारदीय नवरात्री, ९ दिवस करू नका या चुका

मुंबई: यावेळेस शारदीय नवरात्री ३ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. याचे समापन १२ ऑक्टोबरला विजयादशमीच्या दिवशी होईल. यावेळेस यावेळेस दुर्गा माता पालखीमधून येत आहेत. भक्त नवरात्रीत दुर्गा मातेच्या नावाचे व्रत ठेवतात.


ज्योतिषांच्या मते, शारदीय नवरात्रीमध्ये काही चुकांपासून दूर राहिले पाहिजे. जर तुम्ही नवरात्रीत दुर्गा मातेची उपासना करायची असेल तर घराची चांगल्या पद्धतीने सफाई करा. तसेच घरातील मंदिरही साफ करा. घरात कोणत्याही प्रकारची घाण असता कामा नये.


शारदीय नवरात्रीच्या आधी घरी अनुपयोगी वस्तू जसे खराब इलेक्ट्रॉनिक वस्तू हटवा, या सर्वांमुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते.


याशिवाय घरातील मंदिरामध्ये माता दुर्गेचे छोटे चित्र अथवा फोटो ठेवा. याचा आकार तुमच्या अंगठ्याएवढा असावा.

नवरात्रीत दुर्गा मातेची पुजा करत असल्यास तामसी भोजनपासून दूर राहा. यामुळे ९ दिवस सात्विक भोजन करा.

दुर्गा मातेच्या पुजनाआधी नेहमी स्नान करून मंदिरात प्रवेश करा आणि स्वच्छ वस्त्र धारण करा.

याशिवाय दुर्गा मातेला अपवित्र भोग अर्पण करा. तर स्वच्छतेने बनवलेले नैवेद्य दुर्गा मातेला अर्पण करा.

जर तुम्ही नवरात्रीत अखंड ज्योती पेटवत असाल तर संपूर्ण ९ दिवस अखंड ज्योती लावा. तो विझला नाही पाहिजे.

 
Comments
Add Comment

वांद्रे पश्चिममधील एस. व्ही. रोडवरील त्या तुंबणाऱ्या पावसाच्या पाण्यापासून मिळणार मुक्ती

मुंबई (सचिन धानजी) : वांद्रे पश्चिम येथील एस व्ही रोड आणि के.सी मार्गावर पावसाळ्यात पाणी तुंबण्याच्या वारंवारच्या

५५ देशांच्या युद्धनौकांचे भारताच्या समुद्रात शक्तीप्रदर्शन होणार; पाच दिवसांचा संयुक्त अभ्यास, शस्त्र पाहणी

नवी दिल्ली : सध्याच्या भारत-पाकिस्तान, अफगाणिस्तान-पाकिस्तान, अमेरिका-भारत, अमेरिका-रशिया-युक्रेन, इस्रायल-इराण,

ट्रेन तिकीटांच्या बुकींग नियमांत मोठा बदल; आता याच लोकांना मिळणार लोअर बर्थ

नवी दिल्ली : रेल्वे प्रवाशांची सुविधा लक्षात घेऊन तिकीट बुकींगच्या प्रक्रीयेला अधिक सोपी आणि पारदर्शक

हिंदू पत्नीबद्दलच्या वक्तव्यामुळे व्हान्स यांच्यावर हिंदुफोबिक असल्याची टीका

वॉशिंग्टन : अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स आणि उषा व्हान्स यांच्या वैयक्तिक आणि राजकीय आयुष्यात सध्या

११ कोटींची लॉटरी जिंकली, पण विजेता गायब !

पंजाब : पंजाब सरकारने काढलेल्या दिवाळी बंपर लॉटरीमध्ये बठिंडा येथील एका व्यक्तीचे नशीब एका रात्रीत बदलले आहे. या

टेनिसपटू रोहन बोपण्णाची टेनिसमधून निवृत्ती

मुंबई : भारताचा स्टार टेनिसपटू रोहन बोपण्णा याने निवृत्तीची घोषणा केली आहे. वयाच्या ४३ व्या वर्षी तो पहिल्यांदाच