Wednesday, April 23, 2025
Homeताज्या घडामोडीPM Narendra Modi : पावसामुळे मोदींचा दौरा रद्द! पुढील कार्यक्रमासाठी चाचपणी सुरु

PM Narendra Modi : पावसामुळे मोदींचा दौरा रद्द! पुढील कार्यक्रमासाठी चाचपणी सुरु

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे आज पुणे (Pune) दौऱ्यावर येणार होते. विकासकामांच्या उद्धाटनासाठी हा दौरा घेण्यात येणार होता. परंतु काही दिवसांपासून परतीच्या पावसाने (Heavy Rain) धुमाकूळ घातला असून पुण्यातही पावसाची संततधार कोसळत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजचा पुणे दौरा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु यादरम्यान नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत असल्यामुळे आयोजकांकडून ऑनलाईन उद्घाटनाची चाचपणी सुरु करण्यात आली आहे. त्याचबरोबर कार्यक्रमाची संपूर्णरित्या तयारी झाली असल्यामुळे यासंदर्भात आज दुपारी १२ वाजता भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे.

सभेची जागा बदलण्याची शक्यता

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्याच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यात ते एकूण १२ प्रकल्पाचे भुमीपूजन करणार होते. पण ज्या एस.पी.महाविद्यालयाच्या मैदानावर त्यांची सभा होणार आहे, त्या मैदानावर प्रचंड चिखल झाल्यामुळे सभेची जागा बदलण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भूमिपूजन व तसेच उदघाटने पार पाडल्यानंतर ६ वाजून ५५ मिनिटांच्या सुमारास दिल्लीकडे प्रयाण करणार होते. दरम्यान, सायंकाळी पुन्हा पावसाला सुरुवात झाली तर मोदी यांच्या सभेचे ठिकाण बदलण्यात येणार आहे,पर्यायी व्यवस्था म्हणून गणेश कला व संस्कृती मंडळाचे सभागृह राखीव ठेवण्यात आले आहे.

कसा होता पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा?

पंतप्रधान दुपारी ४ वाजता विमानतळावरून शिवाजीनगर मेट्रो स्थानकात येणार होते. तिथून ते मेट्रोने स्वारगेटला जाणार होते. स्वारगेटवरून गाडीने स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर आल्यानंतर त्यांची जाहीर सभा होणार होती. मेट्रोसह एकूण १२ प्रकल्पांचे त्यांच्या हस्ते लोकार्पण व भूमिपूजन होणार होते. स्वारगेट ते कात्रज या विस्तारीत भुयारी मेट्रो मार्गाच्या कामाचाही समावेश होता. सभेनंतर फर्ग्यूसन महाविद्यालय परिसरात त्यांच्या रोड शोचेही आयोजन करण्यात आले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -