पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज पुणे (Pune) दौऱ्यावर असून पुणेकरांकडून पंतप्रधानांचं जंगी स्वागत करण्यात येणार आहे. नेहमीप्रमाणे नरेंद्र मोदी ज्यावेळेस पुण्यात येतात तेव्हा त्यांच्यासाठी विशेष पगडी बनवली जाते. दरवेळी पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्यातील पगडी हा चर्चेचा विषय असतो. या पगडीवर खास मराठी संस्कृती किंवा महाराष्ट्राच्या संस्कृतीचं रेखाटन केले जाते. यावेळीसुद्धा ही पगडी बनवण्यात आली आहे.
पुण्यातील प्रसिद्ध मुरुडकर झेंडेवाले (Murudkar Zendewale) यांच्यातर्फे ही पगडी तयार करून घेण्यात आली आहे.आता तयार करण्यात आलेल्या पगडीला ‘संत तुकाराम पगडी’ (Sant Tukaram Pagdi) असे नाव देण्यात आले आहे. वारकरी संप्रदाय आणि अठरा पगड जातींना साद घालण्याचा प्रयत्न या पगडीमार्फत करण्यात येणार आहे.