मुंबई: कुकिंग ऑईल आपल्या जेवणातील महत्त्वाचा पदार्थ आहे. चव असो वा पोषण दोन्ही देणारे हे तेल खाण्याचा स्वाद आणि त्याचे टेक्स्चर सर्वच बदलतात. तळणे असो वा भाजणे यामध्ये तेल अतिशय गरजेचे आहे. मात्र तुम्ही जेवणात जे तेल वापरता ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक तर नाही ना?
पाम ऑईल – यात सॅच्युरेटेड फॅट लेव्हल सर्वाधिक असते. यामुळे कोलेस्ट्रॉल वेगाने वाढते. यामुळे हृदयासंबंधित आजारांचा धोकाही वाढतो.
व्हेजिटेबल्स ऑईल्सचे ब्लेंड – यात अनेकदा कॉर्न ऑईल, कनोला ऑईल आणि पाम ऑईल यांचे मिश्रण असते. हे तेल अतिशय प्रोसेस्ड आणि रिफांईड असते. यात ओमेगा ६ फॅटी अॅसिडचे प्रमाण अधिक असते. हे तेल अधिक खाल्ल्याने शरीरात इन्फ्लामेशनचा धोका अधिक वाढतो.
कॉर्न ऑईल – यात पॉलिअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड भरलेले असते. हेच कारण आहे की या कुकिंग ऑईलचा वापर फायदेशीर नव्हे तर नुकसानदायक ठरतो.
सनफ्लॉवर ऑईल – यात ओमेगा ६ फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात असते. अशातच तुम्ही याचा अधिक वापर करत असाल तर शरीरात इन्फ्लामेशन वाढू लागते.
राईस ब्रान ऑईल – या पाचव्या तेलाचे नाव ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. कारण बाजारात राईस ब्रान ऑईल हेल्दी म्हणून विकले जाते. यात ओमेगा ६ फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात असते. हे रिफाईंड आणि प्रोसेस्ड असते. हे तेल प्रोसेस्ड करण्यासाठी हॅक्सेन नावाचे केमिकल वापरले जाते.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात टक्कर…
मुंबई : केंद्रीय कामगार संहितेच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र वेतन संहिता नियम, २०२५ आणि…
Rafrigerator Care: सध्या उन्हाळा प्रचंड वाढला असून,या काळात एसी , कूलर पाठोपाठ थंडगार पाणी तसेच…
मुंबई: उन्हाळ्यात आपले शरीर थंड ठेवणे अतिशय गरजेचे असते.कारण या मोसमात अॅसिडिटी, डायरिया तसेच पचनासंबंधित…
कोल्हापूर : राज्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. एसटी बस, ट्रक यांचे अपघात सर्रास पाहायला…
मेरठ: शुभांगी अत्रे यांच्या माजी पतीच्या निधनानंतर, टीव्ही इंडस्ट्रीमधून आणखी एक वाईट बातमी समोर येत…