Shreyas Iyer: श्रेयस अय्यरने मुंबईत केली कोट्यावधीची गुंतवणूक

मुंबई: भारताचा क्रिकेटर श्रेयस अय्यर आणि त्याची आई रोहिणी अय्यरने मुंबईमध्ये आलिशान अपार्टमेंट खरेदी केले आहे. याची किंमत २.९० कोटी रूपये सांगितली जात आहे. मिडिया रिपोर्ट्सनुसार हे अपार्टमेंट मुंबईच्या वरळी भागात आहे. रिपोर्टनुसार १९ सप्टेंबरला प्रॉपर्टीचे रजिस्ट्रेशन झाले होते. श्रेयस अय्यरबाबत बोलायचे झाल्यास त्याला नुकतेच इराणी कप २०२४ साठी मुंबईच्या संघात निवडण्यात आले आहे.


रिपोर्टनुसार श्रेयस अय्यरचे हे नवे अपार्टमेंट वरळीच्या आदर्श नगरमध्ये त्रिवेणी इंडस्ट्रीयल सीएचएसएलच्या दुसऱ्या मजल्यावर आहे. ५२५ स्क्वे फूट एरिया आहे. ही प्रॉपर्टी त्यांनी ५५,२३८ रूपये प्रती स्क्वे फुटाने खरेदी केली आहे.



मुंबईत आधीही खरेदी केले आहे घर


ही काही पहिलीच वेळ नाही जेव्हा श्रेयस अय्यरने रिअल इस्टेटमध्ये पैसे गुंतवले आहेत. त्याने मुंबईतील सर्वात उंच इमारतींपैकी एक लोढा वर्ल्ड टॉवर्समध्येही घर खरेदी केले आहे. त्याने सप्टेंबर २०२०मध्ये द वर्ल्ड टॉवर्सच्या ४८व्या मजल्यावर २३८० स्क्वे फुटाचे घर खरेदी केले होते. या अपार्टमेंटमध्ये ३ कार पार्किंगची सुविधा उपलब्ध आहे तर जुलै २०२४मध्ये अय्यर त्या खेळाडूंच्या यादीत सामील झाला होता ज्यांनी मुंबईत कमर्शियल प्रॉपर्टी खरेदी केली आहे.



इराणी कपमध्ये खेळणार श्रेयस अय्यर


श्रेयस अय्यरला १ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या इराणी कपसाठी मुंबई विरुद्ध रेस्ट ऑफ इंडियाच्या सामन्यात मुंबईच्या संघाकडून निवडण्यात आले आहे. अय्यरला शेवटचे जानेवारी २०२४मध्ये भारतीय संघासाठी खेळताना पाहिले होते. त्यावेळेस भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिका सुरू होती. यानंतर डोमेस्टिक स्तरावर क्रिकेट न खेळल्याच्या कारणाने अय्यरला बीसीसीआयने सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून बाहेर केले होते. आता अय्यर नियमितपणे डोमेस्टिक क्रिकेट खेळत आहे आणि टीम इंडियात पुनरागमनाची अपेक्षा लावून बसला आहे.

Comments
Add Comment

Asia cup 2025: आज ओमानविरुद्ध भारताचा सामना, प्लेईंग ११मध्ये होऊ शकतात हे बदल

अबुधाबी: आशिया कप २०२५ मध्ये भारताने 'सुपर-४' फेरीसाठी आधीच पात्र ठरल्यामुळे, आज ओमानविरुद्ध होणाऱ्या सामन्यात

आशिया कप २०२५: सुपर-४ चे संघ ठरले, पाहा असे असेल वेळापत्रक

दुबई: आशिया कप २०२५ च्या सुपर-४ फेरीचे चित्र आता पूर्णपणे स्पष्ट झाले आहे. ग्रुप स्टेजमधील थरारक सामन्यांनंतर

६,६,६,६,६- श्रीलंकेविरुद्ध अफगाणच्या या क्रिकेटरने केली कमाल

अबू धाबी: आशिया कप २०२५ मध्ये श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यातील 'करो वा मरो' सामन्यात अफगाणिस्तानचा अनुभवी

नीरज चोप्राने पाकिस्तानच्या अर्शद नदीमला मैदानात दिला नाही भाव

मुंबई: जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५मध्ये आज भालाफेक स्पर्धेच्या फायनलमध्ये सगळ्यांच्या नजरा नीरज

IND vs PAK : हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला!

मुंबई : भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात झालेल्या सामन्यात दोन्ही संघांच्या खेळाडूंनी हस्तांदोलन करण्यास नकार

India A vs Australia A : ध्रुव जुरेलची कमाल, ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध ठोकले शतक

लखनऊ: ऑस्ट्रेलिया 'अ' विरुद्ध सुरू असलेल्या चार दिवसीय कसोटी सामन्यात भारताचा युवा यष्टीरक्षक-फलंदाज ध्रुव