Devendra Fadnavis On Maratha Reservation : “दुर्दैवाने ते टिकू शकले नाही, मात्र…”; मराठा आरक्षणाबद्दल देवेंद्र फडणवीसांच सुस्पष्ट विधान

  187

नवी मुंबई : मराठा समाज हा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने आरक्षणाची मागणी करत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नवी मुंबईत बोलताना एक मोठं वक्तव्य केलय. “मराठा समाजाला त्यांचे अधिकार आणि आरक्षण हे मिळायलाच हवं, असं आमच्या सरकारचं वचन आहे. मराठा समाजाच्या या मागण्या योग्य आहेत. यातून मार्ग काढण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत”, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.


स्व.आमदार अण्णासाहेब पाटील यांची ९१ वी जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच हजेरी लावली. यावेळी इथे माथाडी कामगारांचा भव्य मेळावा आणि गुणवंत कामगार पुरस्कार वितरण समारंभ पार पडला. यावेळीच देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाबद्दल एक मोठे वक्तव्य केले.




“त्यानंतर ते दुर्दैवाने टिकू शकले नाही”



“ अण्णासाहेब पाटील यांची जयंती साजरी करण्यासाठी दरवर्षी आपण इथे जमतो. अण्णासाहेब पाटील यांच्या निमित्तानेच मराठा समाजाची चळवळ उभी झाली. मी मुख्यमंत्री होतो तेव्हा मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. देशात मराठा आरक्षण हे एकमेव आरक्षण होते, जे उच्च न्यायालयात आपण टिकवून दाखवलं. जोपर्यंत मी मुख्यमंत्री होतो, तेव्हा सर्वोच्च न्यायालयातही ते टिकलं. पण दुर्दैवाने त्यानंतर ते टिकू शकले नाही”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.



“मराठा समाजाची पिळवणूक आणि फरफट होता कामा नये”


“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात पुन्हा १० टक्के आरक्षण दिलं. मोदींनीही EWS चे आरक्षण दिलं. मराठा समाजाला त्याचाही फायदा झाला. मात्र आता सातत्याने वेगळ्या आरक्षणाची मागणी होत असल्याने शिंदेंच्या नेतृत्वात आम्ही १० टक्के आरक्षण दिले. वेगवेगळ्या मागण्या आज होत आहेत, त्या चुकीच्या आहेत असं मी म्हणणार नाही. पण आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण जी कोणतीही मागणी मागतोय ती कायद्याच्या चौकटीत बसली पाहिजे, अन्यथा एखादा निर्णय आपण घ्यायाचा आणि कायद्याच्या चौकटी बसला नाही म्हणून न्यायालयाने तो निर्णय रद्द करायचा, अशाप्रकारची वारंवार पिळवणूक आणि फरफट मराठा समाजाची होता कामा नये. त्यामुळेच यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्हीसुद्धा करत आहोत”, असे देवेंद्र फडणवीसांनी म्हंटल.



“मराठा समाजाला त्यांचा हक्क मिळायला हवं”


“मराठा समाजाने विविध समाजाचे नेतृत्व केलं आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे १८ पगड जातीचे मावळे एकमेकांच्या विरोधात उभे आहेत, महाराष्ट्रासाठी अशाप्रकारचे चित्र उभं राहणं हे योग्य नाही. ते उभं होऊ नये, असा सर्वांचाच प्रयत्न आहे. त्यामुळे मराठा समाजाला त्यांचे अधिकार आणि आरक्षण हे मिळायलाच हवं हे आमच्या सरकारचे वचन आहे. पोलीस भरतीमधेही मराठा आरक्षण दिले. मराठा समाजाला त्यांचे हक्क मिळायला हवं, तसेच त्यावेळी समाजामध्ये कुठेही दुफळी निर्माण होऊ नये. आमचा या दृष्टीने सातत्याने प्रयत्न आहे”, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.





Comments
Add Comment

Mumbai Crime news : मुंबईच्या काळाचौकी परिसरात अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, ६ अल्पवयीन मुलांचे धक्कादायक कृत्य

मुंबई : दक्षिण मुंबईतील काळाचौकी परिसरातून हादरा बसणारी घटना समोर आली आहे. काळाचौकी परिसरात एका अल्पवयीन मुलीवर

मुंबईत बेस्टच्या इलेक्ट्रिक बसने केला घात, महिलेचा मृत्यू

मुंबई : मुंबईत सह्याद्री अतिथीगृहाजवळ बेस्टच्या इलेक्ट्रिक बसमुळे मॉर्निंग वॉक करत असलेल्या महिलेचा मृत्यू

मुंबईत दहीहंडीच्या सरावावेळी ११ वर्षांच्या गोविंदाचा मृत्यू

मुंबई : दहीहंडी या सणाला आता एक आठवड्यापेक्षा कमी कालावधी उरला आहे. गोविंदा पथकांचा दहीहंडी फोडण्याचा सराव जोरात

बेस्टच्या उत्पन्नात वाढ, मात्र प्रवासी संख्येत घट

मुंबई (प्रतिनिधी) : आर्थिक संकटातून सावरण्यासाठी बेस्ट उपक्रमाने बेस्ट बसच्या साध्या व वातानुकूलित तिकीट दरात ९

Rain Update : मुंबईत पावसाचा जोर वाढणार

मुंबई : पावसाळ्याच्या ऋतूचे ५० दिवस आता शिल्लक असून, कोकण विभागात १ जूनपासून आत्तापर्यंत पावसाची मोठी तूट कायम

प्रसिद्ध मराठी कलाकार किशोर कदम यांचे मुंबईतलं घर धोक्यात! मुख्यमंत्र्यांना केले मदतीचे आवाहन, नेमकं प्रकरण काय?

कमिटी, पीएमसी आणि बिल्डर यांनी संगनमताने घोटाळा घडवल्याचा केला आरोप  मुंबई: कवी सौमित्र म्हणून प्रसिद्ध असलेले