Thursday, September 18, 2025

Navratri 2024 Colours : यंदाच्या नवरात्रीचे नऊ रंग तुम्हाला माहिती आहेत का? एका क्लिकवर पाहा

Navratri 2024 Colours : यंदाच्या नवरात्रीचे नऊ रंग तुम्हाला माहिती आहेत का? एका क्लिकवर पाहा
३ ऑक्टोबरपासून (3 October) नवरात्रौत्सवाला सुरूवात होणार आहे. ऑक्टोबर, गुरुवार – पिवळा रंग पिवळा रंग हा उबदारपणाचे प्रतीक आहे, जो दिवसभर व्यक्तीला आनंदी ठेवतो. ४ ऑक्टोबर, शुक्रवार – हिरवा रंग आपल्याला निसर्गाकडून मिळालेली देणगी म्हणून हिरवा रंग हा ओळखला जातो. ५ ऑक्टोबर, शनिवार – राखाडी रंग स्थिरतेचा आणि शिस्तबद्धतेचा रंग म्हणून राखाडी रंग हा ओळखला जातो. ६ ऑक्टोबर, रविवार – नारंगी रंग नारंगी हा रंग शांतता आणि सकारात्मक उर्जेने भरलेला असतो. ७ ऑक्टोबर, सोमवार – पांढरा रंग पांढरा रंग शांतता, निर्मळ, पवित्रतेचे प्रतीक आहे. ८ ऑक्टोबर, मंगळवार – लाल रंग लाल रंग प्रेम, राग आणि संघर्ष याचे प्रतीक मानला जातो. ९ ऑक्टोबर, बुधवार – निळा रंग निळा रंग हा उर्जेचे प्रतीक मानला जातो. १० ऑक्टोबर, गुरुवार – गुलाबी रंग गुलाबी रंग हा प्रेमाची भावना आणि नम्रपणा दर्शवतो. ११ ऑक्टोबर, शुक्रवार – जांभळा रंग जांभळा रंग हा महत्त्वाकांक्षा, ध्येय आणि उर्जेचे प्रतीक असतो. नऊ शुभ तिथींना घटस्थापना ते दसऱ्यापर्यंत विविध रूपातील देवीचे पूजन केले जाते.  
Comments
Add Comment