लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ११०० ठिकाणांवर हल्ला, २१ मुले, ३९ महिलांसह ४९२ जणांचा मृत्यू

Share

लेबनान: इस्त्रायल आणि लेबनान यांच्यातील सध्याची स्थिती खूपच बिघडत चालली आहे. गेल्या काही दिवसांपासून दोघांचे एकमेकांवर हवाई हल्ले सुरू आहेत. दरम्यान, यात सर्वाधिक नुकसान लेबनानचे झाले आहे. येथे इस्त्रायलच्या एअर स्ट्राईकमध्ये लेबनानच्या दक्षिण भागात झालेल्या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत ४९२ लोक मारले गेले आहेत. तर १६४५पेक्षा अधिक जखमी झालेत. मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये २१ मुले आणि ३९ महिलांचा समावेश आहे.

बेंजामिन नेतन्याहू यांच्या सैन्याने हिजबुल्लाहच्या साधारण ११०० ठिकाणांवर हल्ले केले आहेत. हे लक्षात घेता इस्त्रायल सरकारने संपूर्ण देशात आगामी ३० सप्टेंबरपर्यंत आणीबाणीची घोषणा केली आहे.

इस्त्रायलच्या सैन्याने सोमवारी सकाळपासून सातत्याने हिजबुल्लाहच्या बेकाच्या क्षेत्रातील दहशतवादी ठिकाणांवर हल्ले केले. या दरम्यान हवाई दलाने कमीत कमी ११०० ठिकाणांना पूर्णपणे उद्ध्वस्त केले. या त्या जागा होत्या जिथे दहशतवादी आपले रॉकेट, मिसाईल्स, लाँचरसाखी धोकादायक हत्यारे ठेवत होते.

इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंचा धमकीवजा मेसेज

यातच इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी लेबनानमध्ये राहणाऱ्या लोकांना व्हिडिओ मेसेजद्वारे धमकीवजा इशारा दिला आहे. त्यांनी लवकरात लवकर आपले ठिकाण सोडावे. हा इशारा गंभीरतेने घ्यावा. आमचे ऑपरेशन संपल्यानंतर लेबनानचे नागरिक आपल्या घरांमध्ये सुरक्षितरित्या परतू शकतात.

 

१० हजार लेबनानवासीचे दक्षिण भागाच्या दिशेने पलायन

इस्त्रायलच्या हल्ल्याने भयभीत झालेले १० हजार लेबनानचे नागरिक दक्षिण भागाच्या दिशेने पळाले आहे. यामुळे बंदरगाह शहर सिडोनच्या बाहेर मुख्य राजमार्गांवर कारची मोठी रांग लागली आहे. याशिवाय सरकारने देशातील अनेक भागांमधील शाळा आणि युनिर्व्हसिटी बंद करण्याचे आदेश दिले आहेत. २००६मधील इस्त्रायल आणि लेबनान यांच्यातील युद्धादरम्यान झालेल्या पलायनानंतरचे हे सर्वात मोठे पलायन आहे.

Recent Posts

KKR vs GT, IPL 2025: गुजरातविरुद्ध घरच्या मैदानावर कोलकत्त्याचा लाजिरवाणा पराभव

कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…

3 hours ago

उबाठाला राणेंचा दणका! सिंधुदुर्गात होणार १५०० कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश!

२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…

3 hours ago

ही कणकवली नव्हे, कुडाळ आहे! निलेश राणे यांच्याशी पंगा नको!

माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…

4 hours ago

नाल्यातून गाळ काढताना ३० सेकंदाचा व्हिडीओ कंत्राट कंपनीला बंधनकारक

लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…

4 hours ago

PM Modi : आजची धोरणं, उद्याचं भारत! – पंतप्रधान मोदींचा नागरी सेवकांना मंत्र

PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…

5 hours ago