
लेबनान: इस्त्रायल आणि लेबनान यांच्यातील सध्याची स्थिती खूपच बिघडत चालली आहे. गेल्या काही दिवसांपासून दोघांचे एकमेकांवर हवाई हल्ले सुरू आहेत. दरम्यान, यात सर्वाधिक नुकसान लेबनानचे झाले आहे. येथे इस्त्रायलच्या एअर स्ट्राईकमध्ये लेबनानच्या दक्षिण भागात झालेल्या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत ४९२ लोक मारले गेले आहेत. तर १६४५पेक्षा अधिक जखमी झालेत. मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये २१ मुले आणि ३९ महिलांचा समावेश आहे.
बेंजामिन नेतन्याहू यांच्या सैन्याने हिजबुल्लाहच्या साधारण ११०० ठिकाणांवर हल्ले केले आहेत. हे लक्षात घेता इस्त्रायल सरकारने संपूर्ण देशात आगामी ३० सप्टेंबरपर्यंत आणीबाणीची घोषणा केली आहे.
इस्त्रायलच्या सैन्याने सोमवारी सकाळपासून सातत्याने हिजबुल्लाहच्या बेकाच्या क्षेत्रातील दहशतवादी ठिकाणांवर हल्ले केले. या दरम्यान हवाई दलाने कमीत कमी ११०० ठिकाणांना पूर्णपणे उद्ध्वस्त केले. या त्या जागा होत्या जिथे दहशतवादी आपले रॉकेट, मिसाईल्स, लाँचरसाखी धोकादायक हत्यारे ठेवत होते.
इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंचा धमकीवजा मेसेज
यातच इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी लेबनानमध्ये राहणाऱ्या लोकांना व्हिडिओ मेसेजद्वारे धमकीवजा इशारा दिला आहे. त्यांनी लवकरात लवकर आपले ठिकाण सोडावे. हा इशारा गंभीरतेने घ्यावा. आमचे ऑपरेशन संपल्यानंतर लेबनानचे नागरिक आपल्या घरांमध्ये सुरक्षितरित्या परतू शकतात.
Message for the people of Lebanon: pic.twitter.com/gNVNLUlvjm
— Benjamin Netanyahu - בנימין נתניהו (@netanyahu) September 23, 2024