नालासोपारा : सोशल मीडियामध्ये मैत्रीच्या नावाखाली ओळख निर्माण करुन महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना पाहून महिला, मुलींच्या मनात पुन्हा असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
मुंबईतल्या मालाड येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीशी सोशल मीडियामध्ये मैत्री करून या मुलीला नालासोपा-यात बोलवून या मुलीवर दोघांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. सामूहिक बलात्काराची नालासोपार्यातील एका महिन्यातील ही सहावी घटना आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी १६ वर्षांची असून मुंबईत मालाड येथे राहते. तिची नालासोपार्यात राहणार्या अनिस शेख (२३) या तरुणाबरोबर सोशल मीडियावर ओळख झाली. त्याने २ सप्टेंबर रोजी तिला नालासोपा़र्यात बोलावून जेव्हा त्यांची भेट झाली तेव्हा त्याने संधी साधत या मुलीवर बलात्कार केला. तसेच याची कोठेही वाच्यता करु नकोस असे बजावून सांगितले.
सदर पीडित मुलगी गप्प राहिल्याचे दिसून येताच त्याने ५ सप्टेंबर रोजी तिला पुन्हा नालासोपारा येथे बोलावले होते. त्यानंतर सनसाईन उद्यानात आरोपी अनिस शेख आणि त्याचा मित्र जियान या दोघांनी तिच्याशी लगट केली. त्यानंतर तिला दुचाकीवर बसवून अर्नाळा येथील एका लॉजमध्ये नेले. तेथेच अनिस शेख याने पुन्हा तिच्यावर बलात्कार केला.
यावेळी झियान याने त्या संबंधाचे आपल्या मोबाईल मध्ये चित्रण केले आणि हा प्रकार कुणाला न सांगण्याची धमकी देत मारहाण देखील केली.
परंतु पीडित मुलीने धीर गोळा करत अखेर अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. परंतु पहिला गुन्हा आचोळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला असल्याने तो आचोळे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.
आचोळे पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ६५(१), ७४, १३७(२), ११५(२), ३५१(२) ३(५) तसेच पोक्सोच्या कलम ४, ८, १२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी आम्ही अनिस शेख या आरोपीला अटक केली आहे. अन्य फरार आरोपीचा शोध सुरू आहे. अशी माहिती आचोळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी दिली.
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…
डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…
महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…
- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…
- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…