Sunday, October 6, 2024
Homeताज्या घडामोडीया गोष्टींवर टॉयलेट सीटपेक्षाही ४०० पटीने अधिक असतात किटाणू

या गोष्टींवर टॉयलेट सीटपेक्षाही ४०० पटीने अधिक असतात किटाणू

मुंबई: तज्ञांच्या मते घरात अनेक अशा गोष्टी आहेत ज्यांच्यावर मोठ्या प्रमाणात घाण असते. रिमोट, मोबाईल, चॉपिंग बोर्डसारख्या गोष्टींवर टॉयलेट सीटपेक्षाही अधिक बॅक्टेरिया असतात.

कटिंग बोर्ड

कटिंग अथवा चॉपिंग बोर्डावर सर्वाधिक किटाणू असतात. ही वस्तू खाण्याशी अधिक संबंधित असता. त्यामुळे फंगस आणि बॅक्टेरिया जमा होण्याचा धोकाही अधिक असतो. त्यामुळे कटिंग बोर्ड नियमितपणे साफ करत राहा आणि चांगला सुकवा.

रिमोट

टीव्ही, गेम्ससाठी रिमोट खूप उपयोगाचा असतो. प्रत्येक घरात रिमोट आढळतो. अनेकदा खाता-पिताना रिमोटला हात लावला जातो. यामुळे रिमोटवर बॅक्टेरिया जमा होतात. जे सहजरित्या आपल्या शरीरात पोहोचतात. यामुळे रिमोट नियमितपणे साफ करत राहा.

स्मार्टफोन

आजकाल चोवीस तास प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो. रात्रंदिवस, झोपताना उठताना मोबाईलमध्ये असतात. एका स्टडीनुसार मोबाईलमध्ये टॉयलेट सीटच्या तुलनेत १० पटीने अधिक घाण असते. मात्र अनेकजण याला साफ करत नाही. यामुळे हे बॅक्टेरिया स्क्रीनवर येतात आणि नुकसान करतात.

पाण्याची बाटली, दरवाजाचे हँडल

याशिवाय पाण्याची बाटली, दरवाजाचे हँडल, लाईट अथवा फॅनचा स्विच, फ्रीजचा हँडल, बेड अथवा बेडशीट यावर सर्वाधिक घाण असते. यामुळे आठवड्यातून कमीत कमी दोन ते तीन वेळा साफ केले गेले पाहिजेत.

डेस्क, कीबोर्ड आणि माऊस

अनेकजण दिवसभरत लॅपटॉप-डेस्कटॉपवर काम केल्यानंतरही अनेकदा याची साफसफाई केली जात नाही. दिवसभर या गोष्टींना कोणत्या ना कोणत्या गोष्टीने हात लावला जातो. यामुळे किटाणू शरीरात पोहोचू शकतात. एका स्टँडर्ड डेस्कमध्ये टॉयलेट सीटपेक्षा ४०० पटींनी अधिक किटाणू असतात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -