मोठी बातमी! राज्यामधील १४ आयटीआय चे नामांतर; महाविद्यालयांना आनंद दिघें अन् विनायक मेटेचं नाव

मुंबई : आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंत्रालयामध्ये पार पडली. या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले असून राज्यामधील सरपंच व उपसरपंचांच्या मानधनात दुप्पटीने वाढ करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त राज्यातील विविध जिल्ह्यात असलेल्या १४ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजेच आयटीआय यांचे नामांतर करण्याचा निर्णयही घेण्यात आलाय. त्यानुसार, या महाविद्यालयांना महापुरुषांचे व संबंधित जिल्ह्यात योगदान दिलेल्या व्यक्तींचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाने १४ आयटीआय यांचे नामांतर करुन १४ महान व्यक्तींची नावेदेखील या आयटीआय संस्थेसाठी दिली आहेत. त्यामध्ये, ठाणे जिल्ह्यातील आयटीआयला (ITI) धर्मवीर आनंद दिघे यांचं नाव देण्यात आलं आहे. तर, बीडमधील (Beed) आयटीआयला दिवंगत नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांचं नाव देण्यात आलं आहे.


राज्य मंत्रिमंडलळाच्या बैठकीत राज्यातील १४ आयटीआयचे नामांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला असून कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या खात्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. या आयटीआय कॉलेजेसला नाव देताना सामाजिक व जातीय समीकरणांचा विचार करण्यात आल्याचं दिसून येते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा जिल्हा असलेल्या ठाण्यातील आयटीआयला धर्मवीर आनंद दिघे यांचं नाव देण्यात आलं आहे. तर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिकलेल्या एल्फिन्स्टनमधल्या महाविद्यालयातील आयटीआयला डॉ. बाबासाहेबांचे नाव देण्यात आले आहे. राजर्षि शाहू महाराजांचे कोल्हापूरच्या आयटीआयला देण्यात आलंय तर बीडच्या आयटीआयला विनायक मेटेंचे नाव देण्यात आलं आहे.

नेमकं कोणत्या आयटीआयला कुणाचं नाव?


सध्याची नावे -                                                       नव्याने करावयाचे नामकरण


०१. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुंबई - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था.


०२ . औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ठाणे - धर्मवीर आनंद दिघे औद्योगिक प्रशिक्षण संस्था.

०३. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जामखेड, जि. अहमदनगर - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था.

०४. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बीड - कै. विनायकराव मेटे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था.

०५. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जव्हार, जि. पालघर. - भगवान बिरसा मुंडा औद्योगिक प्रशिक्षण संस्था.

०६. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, येवला, जि.नाशिक - पालघर महात्मा ज्योतिबा फुले औद्योगिक प्रशिक्षण संस्था.

०७. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कोल्हापूर - राजर्षी शाहू महाराज औद्योगिक प्रशिक्षण संस्था.

०८. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अमरावती - संत गाडगेबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अमरावती.

०९. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सांगली - लोकशाहीर आण्णाभाऊ साठे औद्योगिक प्रशिक्षण संस्था.

१०. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव - कवयत्री बहिणाबाई औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव.

११. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आर्वी, जि. वर्धा - दत्तोपंतजी ठेंगडी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आर्वी, जि. वर्धा.

१२. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बेलापूर, नवी मुंबई.- दि. बा. पाटील औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बेलापूर, नवी मुंबई.

१३. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कुर्ला, मुंबई. - महाराणा प्रताप औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कुर्ला, मुंबई.

१४. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भूम, जि. धाराशिव - आचार्य विदयासागरजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भूम, जि. धाराशिव.

Comments
Add Comment

महाराष्ट्रात सध्या मोठ्या प्रमाणावर कांद्याची विक्री नाही - नाफेड

मुंबई : नॅशनल ॲग्रीकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लि.(नाफेड

न्हावा शेवा बंदरावर आले पाकिस्तानी कंटेनर! DRI ची सर्वात मोठी कारवाई

न्हावा शेवा बंदरातून १२ कोटी रुपयांचे पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधने आणि सुके खजूर जप्त नवी मुंबई:  न्हावा शेवा

आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन, सोमवारी घेणार राज्यपालपदाची शपथ

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे पत्नी दर्शना देवी यांच्यासह रविवारी मुंबई

मुंबई विमानतळावर बनावट भारतीय पासपोर्टवर फिरताना आढळले नेपाळी आणि बांगलादेशी नागरिक

मुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अलीकडेच दोन परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली

मराठा समाजाच्या दोन आरक्षणावर न्यायालयाचा सवाल

एसईबीसीअंतर्गत १० टक्के, की ओबीसीमधून मिळणार आरक्षण मराठा आरक्षणावर ४ ऑक्टोबरला पुढील सुनावणी आरक्षणावरून

मुंबईत मद्यपी तरुणीमुळे अपघात, फुटपाथवर गेली कार आणि...

मुंबई : मद्यपी तरुणीने बेदरकारपणे कार चालवली आणि अपघात झाला. दुभाजकाचा कठडा तोडून कार फुटपाथवर (पदपथ) झोपलेल्या