सुपारीच्या झाडांची खोडे कुजल्याने बागायतदार अडचणीत!

नांदगाव मुरुड : वातावरणातील वारंवार होणाऱ्या बदलांमुळे वाढत चाललेल्या तापमानाचा फटका मुरुड तालुक्यातील सुपारी पिकाला बसत असून जूनपासून सतत पडत असलेला पाऊस व प्रखर उन्हाच्या तीव्रतेचा परिणाम सुपारी झाडांच्या खोडावर होत आहे. त्यामुळे त्यांची खोडे कुजल्याने ती कधी उन्मळून पडतील याचा नेम तर नाहीच. शिवाय एका बाजूने खोड कुजण्याचा परिणाम सुपारी पिकांवर झाला आहे.


मजगावच्या डोंगर भागातील आपल्या मालकीच्या माळरान जमिनीवर येथील वसीम तांडेल यांनी तीनचार वर्षांपूर्वी लागवड केलेली सुपारीची झाडे आता उत्पादनक्षम झाली असताना झाडांच्या ज्या भागात कडक उन्हाच्या तीव्रतेची झळ बसते, तो भाग तडकल्याने त्यात पावसाचे पाणी झिरपून झाडाचे खोड कुजले.परिणामी झाडे कमकुवत होऊन त्यातील काही वाळून गेली आहेत. तर काही जेमतेम तग धरून आहेत.त्याचा उत्पादकतेवरही परिणाम झाला आहे.गेली तीन चार वर्षे रोपांच्या लागवडीपासून मोठ्या मेहनतीने जपलेली ही रोपे ऐन उमेदीच्या काळातच या विचित्र प्रकारच्या रोगामुळे केलेली मेहनत व खर्चावर पाणी पेरले जात असल्याने. येथील सुपारी बागायतदार शेतकरी धास्तावले आहेत.


तसे सुपारीचे झाड हे उंच़़च उंच वाढत असले तरी ते अतिशय नाजूक असते.सुपारी फळांपासून रोपे तयार करतांना रोप जसे वाढते त्याची उन्हाकडील बाजू पाहूनच जशाच्या तशा स्थितीत त्याची पुनर्लागवड करावी लागते अन्यथा उन्हाच्या किरणांचा झाडांच्या एका बाजूला होऊन खोडाला चिरा पडून ती कुजू लागते.याशिवाय लागवड केलेल्या जमिनीतही असलेल्या छोट्या लाल मुंग्या,वाळवी व अळ्याही झाडांना पोखरून उभे झाड अचानक सुकून जाते. त्यासाठी झाडांची लागवड केलेली जमीन ही पाण्याचा योग्य निचरा होणारी असावी, ती खडकाळ, रवाळ असल्यासही तिचा परिणाम झाडांवर व पर्यायाने उत्पादनावर होत असल्याने बागायतदार चिंतेत आहेत.अशा रोगांवर कृषी विद्यापीठाने संशोधन करून त्यावरील उपाय शोधणे गरजेचे आहे.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या डिजिटल भविष्यास मोठी चालना; एअरट्रंकची ₹२ लाख कोटींची गुंतवणूक

मुंबई : महाराष्ट्राच्या डिजिटल पायाभूत सुविधांना मोठी चालना देणारी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र

CNG Car Fire : धूर निघाला अन् क्षणात भडका! पनवेलमध्ये उभ्या CNG वाहनाला भीषण आग; वाहन पूर्णतः जळून खाक

पनवेल : पनवेल येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) कार्यालयाबाहेर उभ्या असलेल्या एका सीएनजी वाहनाला अचानक

गावाला जाते म्हणून निघायची, अन् गर्दीचा फायदा घेत महिला करायची 'हे' कांड

कोल्हापूर : कोल्हापूरच्या मध्यवर्ती बसस्थानक परिसरात महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या एका

Suman Kalyanpur : भावगीतांची सम्राज्ञी ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन

मुंबई : मधुर आणि सुश्राव्य आवाजाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांनी

Goras Bhandar : वर्ध्याच्या ‘गोरस भंडार’वर छापा, २५.८६ लाखांचा साठा जप्त, उत्पादन निर्मिती बंद

वर्धा : गोरसपाक हा देशभर प्रसिद्ध खाद्यपदार्थ तसेच अन्य दुग्धजन्य पदार्थसाठी ग्राहकांच्या उड्या गोरस भंडार या

Pune Liquor Illicit : पुणे विषारी दारू प्रकरणात मृतांचा आकडा 24 वर

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसराला हादरवून सोडणाऱ्या विषारी दारू प्रकरणातील मृतांचा आकडा आता 24 वर पोहोचला