Ashok Saraf : अशोक मामा यांचं छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक; 'या' नव्या मालिकेत झळकणार

मराठी सिनेसृष्टीतले आणि सुपरस्टार म्हणजेच अभिनेते अशोक सराफ…. (Ashok Saraf) आजवर अशोक सराफ यांनी अनेक सुपरहिट चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये भन्नाट काम केलंय. छोट्या पडद्यापासून मध्यंतरी काही दिवस ते दूर होते. मात्र आता छोटा पडदा गाजवायला ते पुन्हा एकदा सज्ज आहेत. लवकरच त्यांची नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘येतोय महाराष्ट्राचा महानायक लवकरच…’, असं म्हणत या मालिकेचा पहिला दमदार प्रोमो समोर आला आहे. ‘कलर्स मराठी’च्या ‘अशोक मा.मा.’(Ashok Ma.Ma) या मालिकेच्या माध्यमातून अशोक मामा छोट्या पडद्यावर कमालीचं कमबॅक करणार आहेत.



अशोक सराफ यांची नवी मालिका


‘अशोक मा.मा.’ या मालिकेची ‘कलर्स मराठी’ने पहिली झलक प्रेक्षकांच्या समोर आणली आहे. या प्रोमोमुळे प्रेक्षकांमध्ये या मालिकेबद्दल कुतूहल निर्माण झालं आहे. मालिकेचा पहिला प्रोमो आऊट झाला असून, प्रेक्षकांसाठी एक खास सरप्राईज देण्यात आलं आहे. महाराष्ट्राचा महानायक टेलिव्हिजनचा पडदा व्यापून टाकायला परत येतोय. नुकताच ‘अशोक मा.मा.’ या मालिकेचा उत्कंठा वाढवणारा प्रोमो आऊट झाला आहे.


‘अशोक मा.मा.’ या मालिकेचा प्रोमो पाहताक्षणी काहीतर गूढ, थरारक असल्याचं जाणवतंय. अत्यंत शिस्तप्रिय, प्रत्येक गोष्टीची खबरदारी घेणारे, काटेकोरपणे वागणारे अशोक मामा यामध्ये दिसत आहेत. तसेच त्यांच्या आयुष्याचा फंडा म्हणजे ‘शिस्त म्हणजे शिस्त’ असल्याचं या प्रोमोमध्ये स्पष्ट होत आहे. मात्र त्यांच्या मिश्कील अंदाजाने सर्वांच्या चेहऱ्यावर ते हसू आणणार आहेत. प्रोमोतील शेवटच्या फ्रेममध्ये दारावर लावलेल्या नेम प्लेटमध्ये ‘अशोक मा.मा.’ असं पाहायला मिळतंय. एकंदरीतच अशोक मामा आणि मालिकेतील त्यांच्या पात्राचं नाव सारखंच आहे. अशोक सराफ यांच्यासोबतच आणखी कोणते कलाकार मालिकेत झळकणार?, याबाबत सर्वानांच उत्सुकता लागून आहे.


या मालिकेचा पहिला प्रोमो समोर आल्याने प्रेक्षकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. या मालिकेबाबत अशोक सराफ यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. मालिका खूपच मनोरंजक आहे. या मालिकेची कथा चिन्मय मांडलेकरने खूप चांगल्या पद्धतीने लिहिली आहे. ‘टन टना टन’ या मालिकेनंतर बऱ्याच वर्षांनी पुन्हा ‘कलर्स मराठी’ वाहिनीच्या माध्यमातून मी टेलिव्हिजनवर कमबॅक करत आहे. शूटिंग करताना खूप मजा येतेय. ही मालिका प्रेक्षकांनाही नक्कीच आवडेल, असं अशोक सराफ म्हणाले.



Comments
Add Comment

पिंट्या’ फेम रोहन गुजर होणार बाबा; आठ वर्षांनंतर आयुष्यातआला आनंद

मुंबई : 'होणार सून मी या घरची' या मालिकेतून घराघरात पोहोचलेला पिंट्या म्हणजेच अभिनेता रोहन गुजर लवकरच बाबा

शुभमंगल सावधान! अखेर दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा आणि रश्मीका मंदाना यांचा विवाहसोहळा संपन्न झाला

मुंबई : मनोरंजन क्षेत्रातील सर्वांची आवडती जोडी आणि चाहते ज्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत होते असे

'फुला'तून उलगडणार मुरळीची संघर्षमय कथा

मुंबई : अस्सल मराठी मातीतल्या वाघ्या-मुरळीची संघर्षमय कथा आगामी 'फुला' चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पहायला

अक्षय कुमार–प्रियदर्शन पुन्हा एकत्र; ‘रामजी आके भला करेंगे’ टीझरमध्ये पीक कॉमेडीची झलक

भूत, धमाल आणि ओजी स्वॅग: ‘भूत बंगला’मधील ‘रामजी आके भला करेंगे’ गाण्याचा टीझर रिलीज मुंबई : भूत बंगला हा २०२६ मधील

लंडन फॅशन वीक २०२६ मध्ये क्रिती सॅनन हिने उधळला ग्लॅमर

लंडन : बॉलिवूडमधील आघाडीची स्टाइल आयकॉन Kriti Sanon हिने पुन्हा एकदा लंडन फॅशन वीकमध्ये आपल्या शानदार उपस्थितीने

अल्लू अर्जुन आणि दीपिका पदुकोण स्टारर ‘AA22xA6’मध्ये नवी जोडी ठरली चर्चेचा विषय

मुंबई : भारतीय सिनेमात पहिल्यांदाच असा काहीतरी मोठा धमाका घडणार आहे, जो खऱ्या अर्थाने भव्य ठरणार आहे. दीपिका