गळाभेट घेतली, हात पकडून चालले, पंतप्रधान मोदींचे जो बायडेन यांनी केले स्वागत

न्यूयॉर्क: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्वाड शिखर परिषदेमध्ये अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांची भेच घेतली. येते बायडेन यांनी आपल्या निवासस्थानी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. दोन्ही नेत्यांनी एकमेकांना भेटताच गळाभेट घेतली. यानंतर बायडेनने पंतप्रधान मोदींचा हात धरला आणि ते त्यांना आपल्या घरात घेऊन गेले.


संपूर्ण इतिहासाबाबत बोलायचे झाल्यास यावेळेस भारताचे अमेरिकेसोबतचे संबंध आधीच्या तुलनेत अधिक धनिष्ठ आणि मजबूत झाले आहेत. जो बायडेन यांनी पंतप्रधान मोदींसोबतचे फोटो शेअर करत पोस्ट केले पंतप्रधान मोदी, प्रत्येकवेळेस जेव्हा आपण बसतो तेव्हा मी सहकाराचे नवे क्षेत्र शोधण्याच्या आपल्या क्षमतेने प्रभावित होतो. आजही काही वेगळे नव्हते.


 


अनेक द्विपक्षीय बैठका करतील पंतप्रधान मोदी


पंतप्रधान मोदी यांच्या अमेरिकेच्या दौऱ्यादरम्यान त्यांच्यासोबत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री आणि अमेरिकेतली भारताचे राजदूत विनय मोहन क्वात्रा यांचा समावेश आहे. अमेरिकेच्या टीममध्ये परराष्ट्र मंत्री एंटनी ब्लिंक, राष्ट्रीयसुरक्षा प्रकरणातील राष्ट्रपतींचे सहाय्यक टीएच जेक सुलिवन आणि भारतात अमेरिकेचे राजदूत एरिक गार्सेटी यांचा समावेश होता. या तीन दिवसांच्या दौऱ्यावर पंतप्रधान मोदी ऑस्ट्रेलियासोबतही बैठक करतील.

Comments
Add Comment

पाचगणी ते महाबळेश्वर, युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत भारताची ७ ठिकाणे झळकली!

महाराष्ट्राचा डंका! नवी दिल्ली : देशातील ७ सुंदर ऐतिहासिक स्थळांची नावे युनेस्कोच्या संभाव्य जागतिक वारसा

मतदारयादी सुधारणा हा आयोगाचा विशेषाधिकार

केंद्रीय निवडणूक आयोगाचे सर्वोच्च न्यायालयात स्पष्टीकरण नवी दिल्ली : देशभरात वेळोवेळी मतदारयादी सुधारणा करणे

‘ऑपरेशन सिंदूर’वेळी काँग्रेसकडून पाकिस्तानच्या लष्कराची पाठराखण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हल्लाबोल गुवाहाटी : काँग्रेस नेहमीच भारतविरोधी शक्तींच्या पाठीशी उभी राहते आणि

जयपूरमध्ये नाल्यात कार पडून सात जणांचा मृत्यू

जयपूर : जयपूरच्या शिवदासपुरा पोलीस स्टेशन परिसरातील प्रल्हादपुरा जवळ रिंग रोडच्या खाली असलेल्या पाण्याने

Earthquake : आसाममध्ये ५.८ तीव्रतेचा भूकंप

दिसपूर : आसाममधील गुवाहाटी येथे आज, रविवारी (१४ सप्टेंबर) भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. संध्याकाळी ४:४१

बिहारमध्ये राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू